'आनंदयात्री' निवर्तला! ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचे निधन

06 Mar 2021 22:31:31

MOGHE _1  H x W
 


पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचे शनिवार दि. ६ मार्च रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ६ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे झाला होता. मोघे यांचे ‘लेकुरे उदंड झाली’ नाटकामधील राजशेखर उर्फ राजा आणि पु. ल. देशपांडे यांच्या ‘वार्‍यावरती वरात’मधील बोरकाटे गुरुजी या त्यांच्या भूमिका रंगभूमीवर लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे व सून प्रिया मराठे असा परिवार आहे.
 
 
वाऱ्यावरची वरात या नाटकात त्यांनी केलेली भूमिका आणि सिंहासन सिनेमात त्यांनी केलेली भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहे. श्रीकांत मोघे यांनी तब्बल ६० हून अधिक नाटके आणि ५० हून जास्त चित्रपटांत काम केले आहे. पुलकित आनंदयात्री या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, दुबई, युरोप या ठिकाणीही दौरे केले आहेत. दैनिक मुंबई तरुण भारत परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...



Powered By Sangraha 9.0