मालवणीत माफियांचा ‘फ्लॅट जिहाद’!

27 Feb 2021 12:20:53

flat jihad_1  H



दहशतीच्या माध्यमातून हिंदूंच्या मालमत्ता स्वस्तात लाटण्याचा डाव?




मुंबई:
मालाड मालवणीत सुरू असलेला ‘जिहादी उन्माद’ म्हणजे धार्मिक दहशतीआडून हिंदूंच्या मालमत्ता स्वस्तात लाटण्यासाठी सुरू असलेला ’फ्लॅट जिहाद’ सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्याविषयी विश्वसनीय सूत्रांकडून घेतलेल्या माहितीतून नागरिकांच्या पलायनाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. मालाड पश्चिमेतील मालवणी भागातील ‘छेडा कॉम्प्लेक्स’मध्ये राहणार्‍या एका हिंदू युवकाच्या घरात घुसून मारण्याचा प्रयत्न दि. २३ फेब्रुवारीच्या रात्री झाला होता. त्यानंतर २४ फेब्रुवारीच्या दिवशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संपूर्ण प्रकरणाचे घटनास्थळी जाऊन वार्तांकन केले होते.
 
 
 
 
 
 
त्यावेळी समोर आलेल्या माहितीतून मालवणीत सुरू असलेला प्रकार म्हणजे ‘फ्लॅट जिहाद’च असल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे. आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक भयभीत झाले असून फ्लॅट विकून जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ‘छेडा कॉम्प्लेक्स’मधील अनेक मोठ्या क्षेत्रफळाचे फ्लॅट्स लोक विकून गेल्याचे समजते. ‘छेडा कॉम्प्लेक्स’मधील एक साधारणतः १,१०० चौरस फुटांचा फ्लॅट केवळ ७५ लाखांत एका अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीला विकला गेला असल्याची माहिती समोर आली. फ्लॅटचा मूळ मालक हिंदू होता. त्यामुळे अशाप्रकारे सामाजिक वातावरण बिघडवून त्या माध्यमातून कोट्यवधींची घरे काही कवडीमोल भावात विकत घेतली जातात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
 flat jihad_1  H
 
 

वादग्रस्त ‘छेडा कॉम्प्लेक्स’चा परिसर खूप मोठा आहे. मुंबईसारख्या शहरात इतका मोठा राहण्यायोग्य इमारतींचा परिसर ही दुर्मीळ बाब आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या माध्यमातून चटई क्षेत्र निर्देशांकानुसार बहुमजली इमारतीला परवानगी मिळू शकते. त्यामुळे काही हजार कोटींचा हा व्यवहार असू शकतो. भविष्यातील संधींचा विचार करून इथे पद्धतशीर दहशत पेरली जाते आहे का, हादेखील प्रश्न आहे. अशाप्रकारे फ्लॅट्स स्वस्तात विकत घेणारा एक ‘मसल मॅन’ असून त्याच्या माध्यमातून स्थानिक गुंडांना पाठबळ-प्रोत्साहन दिले जाते. तसेच त्याने आजवर काही इमारतींच्या पुनर्विकासात स्वतःचा व्यवसाय केला आहे. ‘छेडा कॉम्प्लेक्स’च्या आवारात ‘सीसीटीव्ही’द्वारे हा व्यक्ती लक्ष ठेवून असतो. संबंधित ‘सीसीटीव्ही’देखील त्याच्या खासगी गॅलरीतून लावला असल्याची माहिती आहे. ‘छेडा कॉम्प्लेक्स’मधील हा ‘फ्लॅट जिहाद’चा प्रकार गंभीर असून त्यात आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
राजकीय उच्चपदस्थांशी संबंध
 
दरम्यान, मालवणीच्या या ‘मसल मॅन’चे राजकीय पक्षातील उच्चपदस्थांशी जवळचे संबंध असल्याचे समजते. त्यामुळे येथील वादग्रस्त प्रार्थनास्थळाला आजवर संरक्षण लाभले. तसेच त्याचे आर्थिक व्यवहारही सुरळीत सुरु राहिले.


Powered By Sangraha 9.0