सातारा : बिग बॉसफेम आणि नेते अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. ते म्हणजे, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित, ' उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा द्या नाहीतर सक्तीच्या रजेवर जा. मला ८ मार्च म्हणजेच महिला दिनादिवशी मुख्यमंत्री करा. प्रशासनातील सगळ्यांना सुतासारखे सरळ करतो." असे म्हंटले आहे.
"गेल्या दहा महिने लॉकडाऊन करून आपण कोरोनाला प्रतिबंध केला. असे भासवत असला तरी सर्वसामान्य जनता, श्रमिक, कष्टकरी शेतकरी आणि विशेष करून आम्हा कलाकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे, हे विसरून चालणार नाही. राज्याची मला आस्था असल्याने बेरोजगार, उद्योजक, शेतकरी, कलाकार आणि हातावरचे पोट असलेल्या सर्व लोकांची मला आस्था असल्याने मी पोटतिडकीने आपल्याला सांगू इच्छितो आहे," अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. अशा परिस्थितीत ज्या प्रकारे आपण मुख्यमंत्री झाले आहात. त्याच प्रकारे एक दिवस स्वेच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करा. मग बघा मी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो बघा, असे मत बिचुकलेंनी पत्रात व्यक्त केले आहे.