
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे
नागपूर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सोलापूर विजापूर राजमार्गावर चार पदरी रस्त्याचे काम सुरू होते. या अंतर्गत २५.५४ किमी एकेरी मार्गाचे डांबरीकरण केवळ १८ तासांत पूर्ण करण्यात आले. या विक्रमाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद करण्यात आली.
यासाठी कंत्राटदार कंपन्यांच्या पाचशे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने हे कार्य प्रगतीपथावर आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, अधिकारी, कंत्राटदार कंपनी आणि सर्व कामगारांचे अभिनंदन केले. सोलापूर-विजापूर राजमार्ग ११० किमीचे काम प्रगतीपथावर आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
____________________________________________________________________________________________