अवैध मशिदीविरोधात तक्रार करणाऱ्याला जमावाकडून दमदाटी

24 Feb 2021 15:38:34

masjid_1  H x W
 

मुंबई
: मुंबईतील मालवणी येथील कट्टरपंथी जिहादींचा उन्माद वाढतोच आहे. मंगळवारी मालवणीतील छेडा कॉम्प्लेक्समधील रहिवासी रमेश याला वीस-पंचवीस जणांच्या धर्मांधांनी घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केला. रमेश यांचे मित्र प्रवीण जैन यांनी अवैध मशिदीविरोधात तक्रार दाखल केली होती. प्रवीण सध्या जिवाच्या भीतीने मुंबईबाहेर आहेत.
 
 
मालवणी येथे हिंदू दलितांना घर सोडून जाण्यासाठी सुरू झालेल्या दबावतंत्राचे प्रकरण ताजे असतानाच आता हा नवा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मालवणीतील छेडा कॉम्प्लेक्स मध्ये कट्टरपंथी धर्मांदांच्या जमावाने रमेश व त्यांच्या कुटुंबियांना दमदाटी करून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. रमेश हे प्रवीण जैन यांचे मित्र आहेत. प्रवीण जैन यांनी छेडा कॉम्प्लेक्स परिसरातील एका अवैध मशिदीविरोधात तक्रार दिली होती. महापालिकेने याविषयी अलीकडेच मशिदीला नोटीस दिल्याचे समजते. त्यामुळे कट्टरपंथी धर्मांधांच्या रोषाला प्रवीण आणि रमेश यांच्या कुटुंबियांना सामोरे जावे लागत आहे.
 
 
रमेश यांच्या कुटुंबियांना मंगळवारी संध्याकाळी दमदाटी (Bullying) करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास वीस ते पंचवीस जिहादींनी रमेश यांच्या घराबाहेर जमाव केला होता. "त्याला बाहेर पाठवा आम्हाला त्याच्याशी बोलायचे आहे", असे जमावातील लोक म्हणत होते. प्रसंगावधान राखून रमेश याच्या कुटुंबियांनी जमावाला घरात घुसू दिले नाही. तसेच सोसायटीतील काही रहिवासी आणि रमेशच्या कुटुंबीयांनी पोलिसांना १०० नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत, अशी माहिती समोर येते आहे. रमेश आणि त्यांचा भाऊ पोलीस ठाण्यात गेले. आज सकाळपासून रमेश आणि त्यांचे कुटुंबीय मालवणी पोलीस ठाण्यात असून त्यांना करण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0