कणकवली (गायत्री श्रीगोंदेकर) : भाजप नेते आमदार नितेश राणे यांना ताब्यात घेण्याची महाविकास आघाडी सरकारची सुरू असलेली धडपड आणि त्यामागचे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालांनंतर जवळपास स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दिसत असलेला पराभवच नितेश राणेंच्या अटकेमागचे कारण होते. नितेश यांना ताब्यात घेण्यावरून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेनी महाविकास आघाडीच्या साम, दाम, दंड, भेद या नितीला उलथवून लावत भाजप पुरस्कृत पॅनलला विजय खेचून आणून दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल सुस्पष्ट झालेय १९ पैकी ११ जागांवर भाजप पुरस्कृत पॅनेल विजयश्री खेचून आणला. निकालांनंतर जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी ३० डिसेंबर २०२१ रोजी मतदान झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने दणदणीत विजय मिळविला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विजय साजरा करण्यासाठी कोकणात दाखलही झाले.
या निवडणुकीत ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणूकीमुळे अनेक दिग्गजांना या पराभवाचा पहावा लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक संपूर्ण राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आली.त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कथित हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले.
त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे आ. नितेश राणेंना ताब्यात घेण्याची महाविकास आघाडीची धडपड आणि त्यामागचे कारण आता केवळ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिसत असलेला पराभव पाहूनच राणेंविरोधातील कारवाई तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाही नोटीस बजावण्यापर्यंत हे प्रकरण येऊन पोहोचले.
आता जिल्हा बँकेची आर्थिक उलाढाल पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्वोच्च जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीला अधिकृत भाग भांडवल १.२५ कोटी इतके मर्यादित होते परंतु सध्या बँकेचे अधिकृत भागभांडवल रु. ३० कोटींपर्यंत वाढले आहे. सिंधुदुर्गच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ४० टक्के पेक्षा जास्त नागरिक हे बँकेचे खातेदार आहेत.
बँकेची आर्थिक उलाढाल ही २५०० कोटींच्या घरात आहे.
निवडणुकीचे महत्व ओळखून महविकास आघडीतील नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पश्चिम महाराष्ट्र सोडून आता कोकणातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला होता. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही कोण अजित पवार? अशी प्रतिक्रिया दिली. तसेच या निवडणूक होईपर्यंत मी इथून हलणार नाही असेही वक्तव्य केले. यातूनच राणेंनी महाविकास आघाडीला सूचक संदेश दिला होता की ही निवडणूक भाजप पुरस्कृत पॅनेलचा जिंकणार हे एव्हाना महविकास आघडीच्या नेत्यांना कळून चुकले होते.
राणेंना केंद्रात मंत्रिपद मिल्यानंतर कोकणात भाजपला मिळालेला जनाधार हा उल्लेखनीय आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक २००८ ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ११ वर्ष राणेंच्याच ताब्यात होती. मात्र २०१९साली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली होती. याचे फळ अखेर राणे यांना मिळाले आहे.
आता या बँकेवर भाजपची सत्ता असेल. त्यामुळेच नितेश राणेंवर कारवाई करून राणेंना या निवडणुकीपासून दूर ठेवता येईल का? ही रणनीती महाविकास आघडीनें कदाचित आखली असावी. मात्र आता भाजपच्या विजयाने हा प्रयत्न फोल ठरला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येंनी राणे फॅक्टर हा महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर वरचढ ठरणार असे आपण या विजयांनंतर म्हणून शकतो.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय! केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, रवींद्र चव्हाण आणि सर्व भाजपा नेते, कार्यकर्ते, विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनीही या विजयाबद्दल प्रतिक्रीया दिली.