'मिर्झापूर'चा ललित सिनेरसिकांच्या मनाला चटका लावून गेला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2021
Total Views |

bramha mishra_1 &nbs
 
मुंबई : मिर्झापूर ही वेब सिरीज ही सिनेरसिकांच्या लक्षात राहणारी एक कलाकृती आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनय केलेल्या मुन्नाभैयाच्या पात्रापासून काही क्षणांसाठी आलेल्या इतर कलाकारांचीदेखील चर्चा अजूनही होते. असेच एका चर्चिलेले पात्र म्हणजे मुन्नाभैय्याचा खास मित्र ललित हेदेखील चर्चेत आले. मात्र, हे पात्र साकारणारा अभिनेता ब्रह्मा मिश्राचा मृत्यू हा मात्र मनाला चटका लावून गेला. सलग ३ दिवस त्याचा मृतदेह हा बाथरूममध्ये पडून होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला हृदयविकाराचा झटका आला असे सांगण्यात आले.
 
 
२९ नोव्हेंबर रोजी छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी ब्रह्मा मिश्राला अपचनाचे औषध देऊन घरी पाठवले. मात्र घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर काह्रे कारण समोर आले.
 
 
मुळचा भोपाळ रायसेनचा असलेला ब्रह्मा मिश्रा ३२ वर्षांचा होता. रायसेनमध्येच त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. त्याचे वडील भूमी विकास बँकेत कामाला होते. मिर्झापूरशिवाय ब्रह्माने केसरी, हसीन दिलरुबा, मांझी, बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्येही काम केले होते. ब्रह्माने २०१३ मध्ये 'चोर चोर सुपर चोर' या चित्रपटातून पदार्पण केले होते. २०२१मध्ये आलेला तापसी पन्नू स्टारर 'हसीन दिलरुबा' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. मुंबईतील संघर्षादरम्यान त्याला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नाही, कारण त्याचे वडील आणि मोठा भाऊ संदीप यांनी त्याला कायम साथ दिली होती.
@@AUTHORINFO_V1@@