मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईवर ओमायक्रॉनचं सावट असतानाच, मुंबईसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वीसवर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत पाच ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईच्या धारावीतील 'त्या' ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असून, तो निगेटिव्ह आला आहे. महापालिका प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली असून अद्याप त्या रुग्णाला डिस्चार्ज दिला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईसाठी ही दिलासादायक बाब आहे. मुंबईत आतापर्यंत पाच जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यापैकी चार जणांचे आतापर्यंतचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील दोन आठवड्यांत पाच जण ओमायक्रॉनबाधित आढळले होते. त्यांना पालिकेच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. त्यातील चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यातील तिघांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. धारावीतील रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, अद्याप त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलेले नाही. सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.