ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क,

11 Dec 2021 08:50:14
 
omicron_1  H x
 
 
 
मुंबई : कोरोनाच्या नव्या विषाणूंमध्ये मोजल्या जाणाऱ्या ओमायक्रॉन वेरियंटच्या वाढत्या प्रसारावरून मुंबई महापालिका सतर्कतेने पाऊले टाकत आहे. पालिकेतर्फे ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. तसेच मुंबई महापालिका रॅपिड अँटिजन चाचण्यांसाठी नव्या २० लाख किट्सची खरेदी करणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 
नऊ रुपयांमध्ये चाचणी करणार : पालिकेचा दावा
ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शहरातील कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता करण्यात येणाऱ्या चाचण्यांसाठी केवळ नऊ रुपये लागणार असून तपासणी झाल्यानंतरचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासांमध्ये अहवाल मिळणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. २० लाख टेस्टिंग किट्सच्या खरेदीबाबतचाचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून तो लवकरच स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0