‘हलाल’वरून केरळमध्ये वादंग!

23 Nov 2021 11:39:56

Halal _1  H x W



केरळमधील हिंदू समाज या ‘हलाल’ प्रमाणित पदार्थांना विरोध करू लागला आहे. पण, केवळ केरळमध्येच नव्हे, तर देशाच्या सर्व भागांमधून या ‘हलाल’ला प्रखर विरोध व्हायला हवा. या ‘हलाल’चे गांभीर्य हिंदू समाजाच्या अजून लक्षात आले असल्याचे दिसत नाही. ‘हलाल’ प्रमाणित मांसाहारी पदार्थांच्या जाहिराती वृत्तपत्रांमधून झळकत असल्या, तरी हिंदू समाजात याबाबत म्हणावी तशी जागृती आल्याचे दिसून येत नाही.
 
 
मध्यंतरी केरळमधील दुकानांमधून ‘हलाल’ नामनिर्देश असलेले पदार्थ विकण्यावरून वाद निर्माण झाला होता. आता त्या वादाने नवे स्वरूप धारण केले असून, या वादाची अनेक नवी रूपे पुढे येऊ लागली आहेत. मुस्लीम मौलवी आणि मुस्लीम कार्यकर्ते अन्नपदार्थांवर थुंकून नंतर त्यांचे वाटप करीत असल्याची अनेक छायाचित्रे अलीकडील काळात समाजमाध्यमांवर झळकली असून, या प्रकरणावरून केरळमध्ये वादंग निर्माण झाला आहे. ‘हलाल’चे फलक केरळमध्ये सर्वत्र झळकले असल्याचे दिसून येत आहे.
 
 
केरळमधील अनेक उपाहारगृहांची मालकी मुस्लिमांकडे असल्याने साहजिकच त्या उपाहारगृहांवर ‘हलाल’ फलक दिसणे स्वाभाविकच. अलीकडील वृत्तानुसार केरळमध्ये अरबी खाद्यपदार्थ मिळणार्‍या उपाहारगृहांची संख्या प्रचंड वाढली असून शाकाहारी उपाहारगृहांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. आता केरळमधील उपाहारगृहांमध्ये मिळणार्‍या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल अनेक आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. ‘हलाल’ नामफलक असलेल्या उपाहारगृहांना टाळण्याकडे जनतेचा कौल असल्याचे दिसून येते. अशा उपाहारगृहामध्ये जे पदार्थ दिले जातात ते न जाणो त्यावर थुंकून तर दिले जात नाही ना, अशी भीती अनेकांना वाटत आहे.
 
 
असाच वाद शबरीमला येथे मिळणार्‍या गुळाच्या पाकिटांवरून निर्माण झाला आहे. तेथे विकल्या जाणार्‍या गुळाच्या पाकिटांवर ‘हलाल’ असा उल्लेख आढळून आल्याने भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणी केरळच्या उच्च न्यायालयामध्ये एस जेआर कुमार नावाच्या व्यक्तीने ‘त्रावणकोर देवसवोम बोर्डा’विरुद्ध एक याचिका दाखल केली आहे. शबरीमला मंदिरामध्ये नेवैद्य आणि प्रसाद तयार करण्यासाठी ‘हलाल’ प्रमाणित गूळ वापरण्यात येत असल्याची तक्रार याचिकेमध्ये करण्यात आली असून त्यास तक्रारदाराने आक्षेप घेतला आहे.
 
 
अन्य धर्मियांच्या धार्मिक प्रथापरंपरांमध्ये ‘हलाल’ प्रमाणित पदार्थांचा वापर करणे, प्रथापरंपरांचे उल्लंघन करणारे आहे, असेही अर्जदाराने नमूद केले आहे. काही मुस्लीम धार्मिक नेते अन्नपदार्थांवर थुंकण्याची म्हणजे लाळ टाकण्याची कृती ही पदार्थ ‘हलाल’ प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असते, असा प्रचार करीत असल्याचेही आढळून आले आहे.
 
 
एकूणच जनतेच्या आरोग्यास घातक असलेला हा प्रकार धर्माच्या नावावर खपवून कसा काय घेतला जात आहे? केरळमध्ये वा जिथे जिथे असा प्रकार चालतो, त्यास आक्षेप कसा काय घेतला जात नाही? अन्नपदार्थांवर थुंकण्याचा हा किळसवाणा प्रकार बंद कसा काय केला जात नाही? खरे म्हणजे मुस्लीम मुल्लामौलवींनीच आरोग्यास हानिकारक असलेला हा प्रकार बंद करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा! पण, त्यांच्याकडून तशी कृती घडण्याची शक्यता वाटत नाही. उलट कोणी विरोध केल्यास आमच्या धर्मामध्ये कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही, अशी आरडाओरड करण्यास ते मोकळे! मुस्लीम धर्मामध्ये तशी प्रथा असली, तरी त्याचा त्रास अन्य धर्मीयांना कशासाठी? त्यांच्यावर ‘हलाल’ पदार्थ घेण्याची सक्ती कशासाठी? तसेच हिंदू समाजास पवित्र असलेल्या शबरीमला येथे ‘हलाल’ प्रमाणित गुळाचा वापर कशासाठी?
 
 
केरळमधील हिंदू समाज या ‘हलाल’ प्रमाणित पदार्थांना विरोध करू लागला आहे. पण, केवळ केरळमध्येच नव्हे, तर देशाच्या सर्व भागांमधून या ‘हलाल’ला प्रखर विरोध व्हायला हवा. या ‘हलाल’चे गांभीर्य हिंदू समाजाच्या अजून लक्षात आले असल्याचे दिसत नाही. ‘हलाल’ प्रमाणित मांसाहारी पदार्थांच्या जाहिराती वृत्तपत्रांमधून झळकत असल्या, तरी हिंदू समाजात याबाबत म्हणावी तशी जागृती आल्याचे दिसून येत नाही.
 
नवज्योतसिंग सिद्धू यांचे डोके ठिकाणावर आहे का?
 
 
पंजाब प्रदेश काँग्रेसचे वादग्रस्त अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू वाटेल तशी शाब्दिक फटकेबाजी करून प्रसिद्धीच्या झोतात राहू पाहत आहेत. मध्यंतरी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याशी झालेल्या वादातून सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे नाटक केले होते. क्रिकेटचे मैदान मारले, की आपण कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी पात्र असल्याचा या नेत्याचा समज झाला असावा. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी क्रिकेटमुळे कितीही मैत्रीचे संबंध असले, तरी भारताशी सदैव हाडवैर बाळगून असणार्‍या पाकिस्तानी पंतप्रधानांबद्दल काय बोलावे आणि काय बोलू नये, याचे भान या सिद्धू महाशयांना राहिले नसल्याचे दिसून येते.
 
अलीकडेच पंजाब काँग्रेसचा हा प्रदेशाध्यक्ष कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाल्याने तेथील गुरुद्वारात दर्शनासाठी गेला असता तेथे त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ते पाहून नवज्योतसिंग सिद्धू एकदम भारावून गेले. त्यांना एकदम पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा उमाळा आला. तेथे त्यांनी इमरान खान यांचा ‘बडे भाई’ असा उल्लेख केला. भारताविरुद्ध सतत दहशतवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा उल्लेख सिद्धू यांनी ‘बडे भाई’ असा करावा, याला काय म्हणावे? सिद्धू यांनी इमरान खान यांची ‘बडे भाई’ म्हणून स्तुती केल्याबद्दल त्यांच्यावर काँग्रेस पक्षाशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीकेची झोड उठविली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली आहे.
 
सिद्धू यांनी आपल्या मुलांना सीमेवर पाठवावे आणि त्यानंतर दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ‘बडे भाई’ संबोधावे, असे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे. सिद्धू यांची मुले लष्करात असती तर त्यांनी कर्तारपूरसाहिब येथे इमरान खान यांना ‘बडे भाई’ असे म्हटले असते का, असा प्रश्न गंभीर यांनी सिद्धू यांना केला आहे. गौतम गंभीर यांनी, इतके निलाजरे वक्तव्य केल्याबद्दल सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. सिद्धू पाकिस्तानच्या जनरल बाजवा यांची गळाभेट घेतात, तर कधी इमरान खान यांना ‘बडे भाई’ म्हणतात. पण, गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये ४० जवान आणि नागरिक मारले गेल्याबद्दल ते चकार शब्दही उच्चारत नाहीत, याकडेही गंभीर यांनी लक्ष वेधले आहे.
केवळ गंभीर यांनीच सिद्धू यांना फटकारले नाही, तर काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. “इमरान खान हे कोणाचे भाऊ होऊ शकतात, पण भारतासाठी ते शत्रूच आहेत,” अशा शब्दांत तिवारी यांनी सिद्धू यांना उत्तर दिले आहे. विविध वादग्रस्त वक्तव्ये करून आपण किती उथळ राजकारणी आहोत हे सिद्धू यांनी यापूर्वी अनेकदा दाखवून दिले आहे. आता इमरान खान यांना ‘बडे भाई’ असे म्हणून आपले डोके ठिकाणावर नसल्याचे या माजी क्रिकेटपटूने दाखवून दिले आहे!



Powered By Sangraha 9.0