हार्दिक पांड्याच्या खुलासा ; ती घड्याळे ५ नाहीतर १.५ कोटींची

16 Nov 2021 11:49:18

Hardik Pandya_1 &nbs
 
 
 
मुंबई : गेले अनेक महिने भारतीय अष्टपैलू खेळाडू हा संघातील स्थान आणि चांगली कामगिरी यासाठी झगडत आहे. आयसीसी टी २० विश्वचषक २०२१मधील त्याची कामगिरी सुमार राहिली. त्यामुळे त्याचे संघातील स्थान हे आता वादात सापडले आहे. आता फक्त मैदानातच नव्हे तर मैदाबाहेरही पुन्हा एकदा एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. दुबईमधून भारतात परतताना कस्टम विभागाने त्याच्याकडील दोन घड्याळे जप्त केली. या घड्याळांची किंमत तब्बल ५ कोटी असल्यचे सांगण्यात येत होते. मात्र, यावर स्वतः हार्दिकने खुलासा करत ती घड्याळे १.५ कोटींची असल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
 
भारतीय संघ रविवारी मायदेशात आला. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याकडे दोन महागडे घड्याळ असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला माध्यमांद्वारे याची किमंत ५ कोटी इतकी असल्यचे सांगण्यात येत होते. मात्र, हार्दिकने याबाबत ट्विट करत खुलासा केला आहे. त्याच्याकडे या घड्याळांचे बिल देखील नव्हते. ही घड्याळे कस्टम वस्तू असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे कस्टम विभागाने ही दोन्ही घड्याळे जप्त केली.
 
 
 
 
हार्दिक पांड्याने ट्विट केले आहे की, "१५ नोव्हेंबर रोजी सकाळी दुबईहून मुंबईला पोहोचल्यावर, मी दुबईहून आणलेल्या मालाचे कस्टम ड्युटी भरण्यासाठी विमानतळावरील कस्टम काउंटरवर गेलो. सोशल मीडियावर माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. विमानतळावर उपस्थित असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांना मी स्वतः सर्व सामानाची माहिती दिली आहे. तसेच, कस्टम विभागाने माझ्याकडे सर्व कागदपत्रे मागितली. सध्या ते योग्य कर्तव्याचे मूल्यमापन करण्यात गुंतले आहेत. मी पूर्ण शुल्क भरण्यास तयार आहे आणि सोशल मीडियावर घड्याळाची जी किंमत ५ कोटी सांगितली जात आहे, ती चुकीची आहे. या घड्याळाची किंमत दीड कोटी रुपये आहे."
 
 
हार्दिक पांड्या म्हणाला की, "मी देशाचा कायदा पाळणारा नागरिक आहे आणि सरकारच्या सर्व यंत्रणांचा आदर करतो. मला मुंबई सीमाशुल्क विभागाचे पूर्ण सहकार्य लाभले आहे आणि मी दुबईहून आणलेल्या मालाचे मूल्यांकन आणि बिल आणि सर्व कागदपत्रे यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे," असे त्याने ट्विट करत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. हार्दिक पंड्याला महागड्या घड्याळांची आवड आहे. याआधी तो यामुळे चर्चेत राहिला आहे. गेल्या वर्षी त्याचा भाऊ कृणाल पांड्यालादेखील एक कोटी रुपयांचे सोने आणि अन्य महाग घड्याळ या सामानांचा उल्लेख केला नसल्याने कारवाईला सामोरे जावे लागले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0