ऑक्टोबरमध्ये १ लाख ३० हजार १२७ कोटी रूपये ‘जीएसटी’ संकलन

01 Nov 2021 17:04:41

GST _1  H x W:




नवी दिल्ली
: ऑक्टोबर २०२१ महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण १,३०,१२७ कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी २३,८६१ कोटी रुपये,एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी ३०,४२१ कोटी रुपये, आयजीएसटी ६७,३६१ कोटी रुपये (यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले ३२,९९८ कोटी रुपये) आणि अधिभार ८,४८४ कोटी रुपये ( यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले ६९९ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

 
सरकारने नियमित तडजोड म्हणून आयजीएसटीमधून २७,३१० कोटी रुपये सीजीएसटीला आणि २२,३९४ कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, ऑक्टोबर २०२१ या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीपोटी ५१,१७१ कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी ५२,८१५ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.


गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा ऑक्टोबर २०२१ मध्ये २४ % अधिक तर २०१९-२० पेक्षा ३६% अधिक महसूल संकलित झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी ३९% अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल याच स्त्रोतांद्वारे गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा १९% अधिक राहिला.

 
 
ऑक्टोबरमधील जीएसटी महसूल हा जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यापासूनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक महसूल आहे, एप्रिल २०२१ मध्ये सर्वोच्च महसूल संकलित झाला होता जो वर्षअखेर महसुलाशी संबंधित होता. अर्थव्यवस्था सुधारत असल्याच्या कलाशी हे सुसंगत आहे. दुसऱ्या लाटेपासून दरमहा तयार होणाऱ्या ई-वे बिलांच्या कलावरून देखील हे स्पष्ट होते.






Powered By Sangraha 9.0