Custom Heading

काँग्रेसचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2021
Total Views |

NCP _1  H x W:
 
  
बीड : बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाई नगर परिषद अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
 
 
 
राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
 
 
 
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणी देखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होऊ न देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करू," असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.
 
 
 
यावेळी आ. सतीश चव्हाण, आ. संजय दौंड, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, मा.आ. बसवराज पाटील, मा.आ. पृथ्वीराज साठे, मा.आ.सय्यद सलीम, मा.आ. राजेंद्र जगताप, मा.आ. संजय वाघचौरे, रा.कॉ. बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रा.कॉ.औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, रा.यु.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब चव्हाण, शिवाजी सिरसाट, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, भाऊसाहेब तरमळे तसेच राजकिशोर मोदी व विजय चव्हाण यांच्यासमवेत प्रवेश केलेले सर्व सहकारी, पदाधिकारी उपस्थित होते.






@@AUTHORINFO_V1@@

Custom Heading

जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..