'वेळेवर पगार नाही' ; आणखी एका एसटी बस चालकाची आत्महत्या

बीडमध्ये ड्युटी पूर्ण करून बस चालकाने घेतला गळफास

    12-Oct-2021
Total Views | 170

Beed_1  H x W:
बीड : गेली काही वर्ष अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बीडमधील आणखी एका बस चालकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकाराम सानप असे या बस चालकाचे नाव असून एसटी महामंडळाचा पगार वेळेत होत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. तुकाराम सानप हे बीड आगारात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. तुकाराम यांनी सोमवारी दिवसभर नियोजनानुसार बसच्या फेऱ्या पुर्ण केल्या त्यानंतर त्यांनी बीड शहरातील अंकुश नगर इथल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तुकाराम यांनी वीज बिल न भरल्याने त्यांच्या घरातील वीज गेल्या १५ दिवसांपुर्वीच खंडीत करण्यात आली होती. तसेच स्वयंपाकासाठी लागणारा किराणा सामान देखील संपला होता. त्यात ७ तारखेला होणारा पगार वेळेवर न झाल्याने त्यांनी सोमवारी रात्री नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121