सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून विकासकामांना निधी
पनवेल: आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने पनवेलच्या विकासाचा आलेख सतत उंचावत आहे. आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिका हद्दीतील शहर व गावांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कायमच पनवेलचा विकास होत आलेला आहे.
पनवेलच्या विकासासाठी जवळपास ३० कोटी रुपयांच्या विकासकामांना महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. शहरांप्रमाणेच गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहेत. गावे विकासाच्या दृष्टिकोनातून ‘स्मार्ट’ झाली पाहिजेत, या अनुषंगाने परेश ठाकूर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.