राम मंदिर प्रतिकृतीच्या चित्ररथाला मिळाला प्रथम क्रमांक

28 Jan 2021 18:14:51

up chitrarath_1 &nbs


प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या सोहळ्यातील यंदाचा 'सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार' जाहीर


मुंबई: प्रजासत्ताक दिनाला राजपथावर पार पडलेल्या सोहळ्यात सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा 'सर्वोत्कृष्ट चित्ररथ' म्हणून पुरस्कार मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाला राजपथावर होणाऱ्या पथसंचालनामध्ये यंदा उत्तर प्रदेशकडून राम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर करण्यात आला. आणि याच चित्ररथाची यंदाचा 'सर्वोत्कृष्ट चित्ररथ' म्हणून निवड करण्यात आली आहे.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून राम मंदिर प्रतिकृती असलेल्या या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 'यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवसाला उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाला प्रथम स्थान देऊन गौरव करण्यात आला. सर्व चमूला हृदयापासून शुभेच्छा. गीतकार विरेंद्र सिंह यांचे विशेष आभार' असं ट्विटसुद्धा केले आहे.

राम मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ राजपथावरून मार्गस्थ झाला तेव्हा प्रेक्षकांकडूनही त्याचं टाळ्या वाजवून कौतुक करण्यात आलं. काहींनी या मंदिरालाच हात जोडले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सोशल मीडियावरून या चित्ररथाचं दर्शन घडवलं होतं. 'जहां अयोध्या सियाराम की, देती समता का संदेश, कला और संस्कृति की धरती, धन्य-धन्य उत्तर प्रदेश' असं त्यांनी या चित्ररथाच्या फोटोसोबत म्हटलं होतं. मुख्य म्हणजे उत्तर प्रदेशला सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला होता.


Powered By Sangraha 9.0