जगाच्या फार्मसीची, 'व्हॅक्सीन डिप्लोमसी'

23 Jan 2021 17:09:55

brazil thanking india_1&n



ब्राझीलने कोरोना लस घेऊन उड्डाण करणाऱ्या हनुमानाचे चित्र पोस्ट करत मानले आभार


मुंबई: आपला भारत देश संपूर्ण 'जगाची फार्मसी' म्हणून ओळखला जातो. जागतिक महामारीच्या विरोधातल्या एकत्रित आणि निर्धारपूर्वक लढ्यात भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशव्यापी ‘कोविड-१९’ लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत साडेदहा लाख लाभार्थ्यांनी लस घेतली. शिवाय चाचण्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या चाचण्यांसंदर्भातल्या पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे कोरोना या जागतिक महामारी विरोधातल्या लढ्याला चालना मिळाली आहे.



भारत संपूर्ण जगासाठी कोरोना काळातही संकटमोचक ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. देशात सध्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींची निर्मिती केली जात आहे. सध्या सोशल मिडीयावर एक फोटो बराच प्रसिद्ध झाला आहे. कारण भारताने ब्राझीलला कोरोनाप्रतिबंधक लसींचा पुरुवठा केला आणि त्याबद्दल आभार मानण्यासाठी त्यांच्या अध्यक्षांनी एक पोस्टर अपलोड केले आहे. ज्यामध्ये जगाच्या नकाशावर भारतातुन हनुमानाने हातात कोरोना लस घेऊन ब्राझीलकडे उड्डाण केलेले दाखवण्यात आले आहे. आणि भारताला धन्यवाद देण्याऱ्या आशयाचा मजकूर सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे.



एकंदरीत आज भारत जगातल्या सध्याच्या कोरोनाच्या सर्वात मोठ्या गरजेबाबत अर्थात कोरोन प्रतिबंधक लसिबाबत पूर्णपणे स्वावलंबी आहे आणि इतर अनेक देशांना मदतदेखील करत आहे. आणि यालाच भारताची ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ म्हटलं गेलय. मुळात 'व्हॅक्सिन डिप्लोमसी’ या शब्दाचा अर्थ असा की, "अत्यंत नाविन्यपूर्ण आणि दुर्लक्षित रोग प्रतिबंधित लसींचा केला विकास आणि चाचण्या" आणि भारताची ओळख तर "जगाची फार्मसी" म्हणून केली जाते. भारताला असलेली प्राचीन आयुर्वेदाची परंपरा तर संपूर्ण जगाने गौरवली आहे.


Powered By Sangraha 9.0