शिवडी खाडीतून समु्द्री गोगलयीच्या एकत्रीकरणाची जगातील पहिलीच दुर्मीळ नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2020   
Total Views |
sea slug _1  H


'बकावान रोटुंडाटा' गोगलयीचे प्रजननासाठी एकत्रीकरण

मुंबई (अक्षय मांडवकर) - मुंबईला लाभलेल्या किनारपट्टीचे जैविक महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. केवळ कांदळवन परिसंस्थेत आढळणाऱ्या 'बकावान रोटुंडाटा' या समुद्री गोगलगायीच्या प्रजननाच्या एकत्रीकरणाची नोंद शिवडी खाडीतून करण्यात आली आहे. भारतातील ही पहिलीच आणि जगात समुद्री गोगलगायींमधील आजवरच्या संख्येने सर्वात मोठ्या एकत्रीकरणाची ही नोंद आहे. 
 
 
कांदळवने ही निरनिराळ्या सूक्ष्म सागरी जीवांची निवासस्थाने असतात. जमिनीवरील गोगलगायींप्रमाणे दलदलीच्या (मडफ्लॅट) आणि खडकाळ किनाऱ्यांवरही समुद्री गोगलगायींचे वास्तव्य असते. मुंबईची किनारपट्टीही या समुद्री गोगलगाईंच्या वैविधतेने समुद्ध आहे. याच गोगलगायींच्या प्रजातीमधील 'बकावान रोटुंडाटा' या प्रजातीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या एकत्रीकरणाची नोंद संशोधकांनी केली आहे. गुरुवारी 'सायन्स डिरेक्ट' या संशोधनपत्रिकेत या नोंदीचे वृत्त प्रकाशित झाले. ही नोंद सागरी जीवशास्त्रज्ञ मोनिषा भारते, मॅन्युअल मॅलाॅकियास आणि ज्येष्ठ सागरी संशोधक डाॅ. दिपक आपटे यांनी केली आहे.
 
 
एप्रिल, २०१९ मध्ये शिवडी खाडीमधील कांदळवन आणि मडफ्लॅटमध्ये सर्वेक्षण करताना आम्हाला मोठ्या संख्येने या गोगलगायी एकत्रीत आलेल्या दिसल्या. निरीक्षणाअंती या गोगलगायी 'बकावान रोटुंडाटा' या प्रजातीच्या असून त्या प्रजननाकरिता एकत्रित आल्याचे आमच्या निदर्शनास आल्याचे मोनिषा भारते यांनी सांगितले. ही प्रजात अशा प्रकारे एकत्रीत आल्याची ही घटना भारतात पहिल्यांदाच नोंदवल्याची माहिती त्यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. तसेच जगात समुद्री गोगलगायींमधील एखादी प्रजात आजवर एवढ्या मोठ्या संख्येने प्रजननासाठी एकत्रित जमल्याची देखील ही पहिलीच नोंद असल्याचे, त्या म्हणाल्या. 
 
 
आजवर अनेक समुद्री गोगलगायी प्रजननासाठी एकत्रित आल्याच्या नोंदी भारतामधून नोंदवल्या आहेत. मात्र, 'बकावान रोटुंडाटा' या प्रजातीच्या एकत्रिकरणाची नोंद करण्यात आली नव्हती. समुद्री गोगलगायींमध्ये होणारे हे थोड्या कालावधीसाठीचे एकत्रिकरण प्रजननाबरोबर खाद्य ग्रहणासाठीही होऊ शकते. 'बकावान रोटुंडाटा' ही प्रजात केवळ कांदळवनांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सर्वसा

@@AUTHORINFO_V1@@