सात छत्रपती, सात पेशवे - बखर मराठेशाहीची

12 Sep 2020 22:07:13

bakhar maratheshahichi_1&


बदलापूरचे लेखक अनंत शंकर ओगले यांचे हे एकतिसावे पुस्तक! विष्णुशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, सुभेदार मल्हारराव होळकर, अ‍ॅडॉल्फ हिटलर, थोरले शाहूमहाराज, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, दयानंद सरस्वती, महाराज यशवंतराव होळकर इत्यादी अनेक चरित्रनायकांवर त्यांनी चरित्रात्मक कादंबर्‍यांचे लेखन केलेले आहे. भारताच्या फाळणीवरही त्यांनी लेखन केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले, वडील शहाजीराजे भोसले यांच्या जन्मापासून म्हणजेच १५९४ पासून ते इ. स. १८१८ मध्ये झालेल्या पेशवाई अस्तापर्यंतचा जवळजवळ २२५ वर्षांचा कालखंड या ‘बखर मराठेशाहीची’ या पुस्तकात संग्रहित झालेला आहे.



मानवी जीवनात इतिहास ही माणसाची सर्वात मोठी प्रेरणा असते. पंजाबातल्या शिखांना सांगताना नेहमी असा अभिमान वाटत राहतो की, केवळ २००वर्षांपूर्वी महाराजा रणजितसिंगांच्या कालखंडात दिल्ली दरवाजापासून ते खैबरखिंडीपर्यंत आमचे साम्राज्य पसरलेले होते. सार्थ, रास्त अशीच ही गोष्ट आहे. पण, मग मराठ्यांनी किती मोठा दावा करावा? दक्षिणेकडे म्हैसूर, अर्काट, त्रिचन्नापल्ली, उत्तरेस दिल्ली, पंजाब, आग्रा, अयोध्या, सरहद्द प्रांतापर्यंत भीमथडीची आणि गंगाथडीची तट्टाणे, खांद्यावर जरीपटका घेऊन धावली. तो पराक्रम त्याला भारतात तुलना आहे का? १७२० ते १७६० पर्यंत इतका मोठा भूभाग मराठी नियंत्रणाखाली आला होता. इतकी भूमी ताब्यात घेण्यास इंग्रजांना २००वर्षे लागली होती. मराठ्यांनी हा भीमपराक्रम केवळ ४० वर्षांत केला होता. दिल्ली जिचे पुरातन नाव ‘इंद्रप्रस्थ’ तिथे महादजी शिंद्यांच्या तलवारीच्या जोरावर तिथल्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा ध्वज १७७२ पासून पुढे कितीतरी वर्षे फडकत होता.शहनशहा औरंगजेबाच्या कुटुंबाची अवस्था तर नियतीने अशी केली होती की, १५ वर्षांत तीनदा मराठी वीरांनी त्याच्या वंशजांना तख्तावर बसविले होते. ते तीन वीर म्हणजे १) रघुनाथराव पेशवा, २) सदाशिवरावभाऊ, ३) महादजी शिंदे.मराठ्यांचा हा पराक्रम इतका जबरदस्त आहे की, हिंदूंच्या वंशात ‘मराठा’ नावाची एक मोठी शक्ती आहे, ते जगाने पाहिले.


बदलापूरचे लेखक अनंत शंकर ओगले यांचे हे एकतिसावे पुस्तक! विष्णुशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, सुभेदार मल्हारराव होळकर, अ‍ॅडॉल्फ हिटलर, थोरले शाहूमहाराज, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, दयानंद सरस्वती, महाराज यशवंतराव होळकर इत्यादी अनेक चरित्रनायकांवर त्यांनी चरित्रात्मक कादंबर्‍यांचे लेखन केलेले आहे. भारताच्या फाळणीवरही त्यांनी लेखन केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले, वडील शहाजीराजे भोसले यांच्या जन्मापासून म्हणजेच १५९४ पासून ते इ. स. १८१८ मध्ये झालेल्या पेशवाई अस्तापर्यंतचा जवळजवळ २२५ वर्षांचा कालखंड या ‘बखर मराठेशाहीची’ या पुस्तकात संग्रहित झालेला आहे. सात छत्रपती आणि सात पेशवे यांच्याशिवाय अगणित मराठी वीरांनी या मराठी पराक्रमाच्या रथाला हातभार लावलेला आहे. मुसलमानांचे हिंदुस्तानातले आगमन, देवगिरी, विजयनगर यांचा संदर्भ देत स्वराज्याच्या सूर्याचा उदय शिवाजीराजांच्या जन्मानंतर कसा झाला, संकटातसुद्धा न डगमगता मराठेशाही कशी तरून गेली, याचे अत्यंत रोमांचक वर्णन ओगले यांनी आपल्या ओघवत्या, रसाळ, शैलीदार भाषेत केलेले आहे. ही बखर म्हणजे आपल्या पराक्रमी योद्ध्यांची स्मरणगाथाच आहे.



इतिहासाचे वाचन कमी असणार्‍या लोकांना आणि अभ्यासकांना ‘मराठेशाही’ काय होती, ते समजावून सांगण्याचे काम ही बखर नक्कीच करेल. तसेच ३०० पानांत या सार्‍या प्रेरक घटना बसविण्याचे काम कौतुकास्पदही आहे.‘मराठेशाही’ हा शब्द उच्चारताच अभिमानाची एक लहर उसळून जाते. स्वातंत्र्य, पराक्रम, स्वधर्म, मुत्सद्देगिरी यांचे आदर्श रूप म्हणजे मराठेशाही-मराठेशाहीची हालत नियतीने मोठी चमत्कारिक केली. म्हणजे, प्रचंड जलवर्षाव आकाशातून व्हावा, पण सारे पाणी वाहून गेल्यावर मागे एक पाण्याचा थेंबही उरू नये, अशी स्थिती मराठेशाहीची झाली! जितक्या प्रचंड वेगाने वरचे टोक मराठ्यांनी गाठले तितकेच भरकन आपण खालीही आलो! पण, मराठेशाही गेल्यावर मागे काहीच उरले नाही, हे पूर्ण सत्य नाही. ग्वाल्हेर, इंदूर, देवास, नागपूर, बडोदा, चित्रकूट, काशी, उज्जैन, सागर, देवगिरी, ब्रह्मावर्त, कोल्हापूर, पुणे, सातारा, तंजावर, झाशी, चांदवड, जांब, सिंधखेड, नरगुंद, ब्रह्मपुरी, मिरज, सांगली, तासगाव, नाशिक, कुरुंदवाड, जमखिंडी याशिवाय इतर कितीतरी ठिकाणे या सार्‍या मराठेशाहीच्या मागे उरलेल्या समाध्याच नाहीत, ही अतिशय आकर्षक पद्धतीने ‘बखर मराठेशाही’च्या मराठी वाचकांसमोर ठेवल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन!



पुस्तकाचे नाव : बखर मराठेशाहीची
लेखक : अनंत शंकर ओगले
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स, ठाणे
पृष्ठसंख्या : 316
मूल्य : रु. 400/-
Powered By Sangraha 9.0