आठ दिवसात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवणार

09 Aug 2020 18:38:40

karntak _1  H x


बेळगाव :
बेळगावातील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात पुन्हा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून आले. परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने पुढील आठ दिवसात पुतळा बसवणार असे आश्वासन दिले.



जर ८ दिवसात शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर ९व्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटले होते. यावरून महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष भाजपमधील नेत्याचे आरोप प्रत्यारोपदेखील सुरु होते. दरम्यान, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
Powered By Sangraha 9.0