कणकवली : "डांबरचोर उदय सामंत! कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हा डांबरचोर सत्तेत आहे. हिंमत असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दे. जय शिवराय!!!", असा घणाघात माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर केला आहे. भाजप सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यावरून सामंत यांनी भाजपला लक्ष्य केले होते. याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका !
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निलेश राणे यांनी टीका केली आहे. सुशांत सिंह प्रकरणावरून बचावासाठी गुजरात दंगलींचा आधार घेतला जात आहे, सत्य कधीही लपणार नाही. या प्रकरणातून कितीही लक्ष्य वळवा काहीही फायदा होणार नाही, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.