महाराष्ट्र 'राज्य कांदळवन वृक्षा'ची घोषणा; 'पांढरी चिप्पी' प्रजातीला बहुमान

07 Aug 2020 15:08:00
mangrove cell _1 &nb


'राज्य कांदळवन वृक्ष' घोषित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य 


मुंबई (अक्षय मांडवकर) - पांढरी चिप्पी ( सोनोरेशीया अल्बा) ही कांदळवनाची प्रजात 'राज्य कांदळवन वृक्ष' म्हणून घोषित करण्यात आली आहे. या घोषणेमुळे एखाद्या कांदळवन प्रजातीला 'राज्य कांदळवन वृक्षा'चा दर्जा देणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने (मॅंग्रोव्ह सेल) यासंंबंधीचा परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. आज पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत या प्रस्तावास परवानगी देण्यात आली. 

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज 'राज्य वन्यजीव मंडळा'ची १५ वी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील वन आणि वन्यजीव संवर्धन प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत 'राज्य कांदळवन वृक्षा'ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचा शेकरू हा राज्य प्राणी, जारूळ हे राज्य फूल, ब्ल्यू माॅरमोन (निलवंत) हे राज्य फुलपाखरु, आंबा या झाडाला राज्य वृक्ष आणि हरियाल पक्ष्याला राज्य पक्ष्याचा बहुमान मिळाला आहे.आता 'सोनोरिशिया अल्बा' म्हणजेच 'पांढरी चिप्पी' या प्रजातीला 'राज्य कांदळवन वृक्षा'चा मान देण्यात आला आहे. देशामध्ये केवळ महाराष्ट्रात कांदळवन संवर्धनासाठी वन विभागाअंतर्गत स्वतंत्र 'कांदळवन कक्ष' काम करतो. या कक्षाअंतर्गत गेल्यावर्षी 'राज्य कांदळवन वृक्ष' घोषित करण्यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव आज 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत मंजूर झाल्याने महाराष्ट्र हे देशातील 'राज्य कांदळवन वृक्ष' म्हणून घोषित करणारे पहिले राज्य ठरले आहे. 
 



'पांढऱ्या चिप्पी'ला 'राज्य कांदळवन वृक्ष' घोषित करण्यासंदर्भातला प्रस्ताव 'कांदळवन कक्षा'अंतर्गत काम करणाऱ्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'मधील तज्ज्ञांनी तयार केला होता. जगभरात काांदळवनाांच्या ६० प्रजाती आढळतात. यापैकी महाराष्ट्रात २० प्रजाती आढळून येतात. मात्र, यातील बहुतांश प्रजाती या राज्याच्या किनारपट्टीवर विखुरलेल्या अवस्थेत आहेत. केवळ 'पांढरी चिप्पी' ही प्रजात किनारपट्टीवर सर्वत्र आढळून येत असल्याने समाजात कांदळवनांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मदत होते. त्यामुळेच ही प्रजात 'राज्य कांदळवन वृक्षा'साठी प्रस्तावित करण्यात आली होती. शिवाय किनारपट्टीलगतच्या काही गावांमध्ये 'पांढरी चिप्पी' ही प्रजात कांदळवन असण्याविषयी अज्ञान आहे. 



राज्यातील कांदळवन संरक्षण व संवर्धनबाबत भरीव काम करणार असून त्याचाच एक भाग म्हणून आज राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सोनोरेशिया अल्बा ( पांढरी चिप्पी)या कांदळवन वृक्षास 'राज्य कांदळवन वृक्षा'चा दर्जा देण्यात आला आहे. - संजय राठोड, वनमंत्री
 
 
'पांढरी चिप्पी' घोषित करण्यामागची कारणे


१) ही प्रजाती राज्याच्या किनारपट्टीलगत सर्वत्र आढळते आणि नवीन तयार होणाऱ्या कांदळवनांमधील जमीन किंवा वाळू घट्ट धरून ठेऊ शकते.
 
२) या प्रजातीमधील जमिनीपासून वरच्या दिशेने वाढणारी आणि जमिनीला धरून ठेवणारी मूळे स्पष्टपणे दिसून येतात.
 
३) या प्रजातीच्या मुळांमध्ये पाण्यातील प्रदूषण कमी करण्याची क्षमता असते. 
 
४) ही प्रजाती २० ते ३० फूट उंच आहे. पाने गोलसर,कांदळवन प्रजातीमधील सर्वात मोठे फुलं (पांढरा रंग), फळे चाांदणीसारखी हिरव्या रंगाची असतात. त्यामुळे ही प्रजाती दिसायला आकर्षक दिसते. 
 
५) पाांढऱ्या चिप्पीची फुले मधमाशाांना आकर्षित करतात. त्यामुळे मधमाशाांना पोळे तयार करण्यासाठी जागा उपलब्ध होते. राज्यात मधमाशाांचे प्रमाण देखील आज कमी होत चालले आहे. त्यामुळे पाांढऱ्या चिप्पीचे संवर्धन झाल्यास पर्यायाने मधमाशाांचे देखील संवर्धन होईल.
 
६) मधमाशांव्यतिरिक्त अनेक पक्षी, कीटक या फुलांकडे आकर्षित होतात.
७) या प्रजीतीची फळे अनेक प्राणी खातात. किनारी क्षेत्राांमधील गावाांमध्ये या फळांचा वापर अन्नासाठी केला जातो. 
८) या प्रजातीचा उपयोग पोटातील कृमी, जखमा, खोकला या आजारांवर केला जातो. 
Powered By Sangraha 9.0