बॉलीवुड ड्रग्ज माफीयांना दणका! 'नारकोटिक्स'चे पथक मुंबईत दाखल

27 Aug 2020 17:46:03
NCB _1  H x W:





मुंबई
: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा आता 'ड्रग्ज-कनेक्शन' उघड झाले आहे. या प्रकरणी तपासासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची (NCB) दिल्लीतील मुंबईत दाखल झाली आहे. सुशांतच्या मृत्यू मागे ‘ड्रग्सचा कट’ रचल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
 
 
 
आता सुशांतसिंह प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) गुन्हा दाखल केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 20, 22, 27, 28, 29 नारकोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री रियासह तिच्या साथीदारांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. रिया विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
ईडीच्या एफआयआरमध्ये ज्यांची ज्यांची नावे होती त्यांच्याविरूद्ध एनसीबीने हे गुन्हे दाखल केले आहेत. यात रियाच्या भावासह इतरांचाही समावेश आहे. या प्रकरणी आता रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, जया साहा, श्रुती मोदी आणि पुण्याचा गौरव आर्य आणि इतर ड्रग्स डिर्लसचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत.
 
 
 
रियाचा भाऊ शौविक आणि इतर काही जणांचे ड्रग्स तस्करांशी संबंध आहेत. यामुळे सुशांतला एखाद्या सुनियोजित षडयंत्रांतर्गत ड्रग्सच्या सापळ्यात अडकवण्यात आलंय का? याचा तपास एनसीबी करणार आहे, याचा तपास करण्यासाठीच आता हे पथक दाखल झाले आहे.
 
 
 
रिया चक्रवर्ती आणि इतर संबंधित जणांचे सातत्याने होत असलेले ड्रग्स चॅट्स उघड झाले आहेत. रिया weed साठी १७ हजार रुपये देण्यास तयार होती. चहा, कॉफी किंवा पाण्यात चार थेंब टाकून त्याला दे, त्याचा परिणाम ३० ते ४० मिनिटांनी जाणवेल, असा मेसेज जया साहाने रियाला केला होता. याच चॅटमुळे आता रिया अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बॉलीवुडशी असलेल्या या ड्रग्ज कनेक्शनचा पर्दा आता उठणार का, हे पुढील तपास ठरवेल.

Powered By Sangraha 9.0