मुंबई : 'नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच "ड्रग- पब-अँड पार्टी" गँगने सुशांत सिंह रजपूतचा बळी घेतला! या "ड्रग-पब-पार्टी" टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? #ED #CBI सत्य समोर आणते आहे! खरे चेहरे ही समोर येतीलच!! न्याय होईल!, असे ट्विट करत भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केला आहे.
सुशांत सिंह प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहेत. रियाच्या चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख केल्याने एनसीबीने गुन्हा दाखल केला आहे. बॉलीवुडमध्ये असलेल्या ड्रग्ज माफीयांना या प्रकारामुळे चाप लागण्याची शक्यता आहे. पण यांना संरक्षण देणारे कोण आहेत. इतके दिवस मुंबई पोलीसांच्या तपासाची दिशा बदलणारे कोण होते, असा प्रश्नही शेलार यांनी केला आहे.