कमल राणी वरूण यांचे निधन : भावपर्ण श्रद्धांजली

02 Aug 2020 13:26:22

Kamal Rani Varun_1 &




लखनऊ
: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री कमल राणी वरूण यांचे कोरोनावर उपचार घेत असताना निधन झाले. दि. १८ जुलै रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर कमल राणी वरूण यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कमल राणी वरूण यांच्या कुटुंबियांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. 

लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात त्या उपचार घेत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. रविवारी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली योगी सरकारतर्फे देण्यात आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांसह इतरांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. २०१७मध्ये कानपूरच्या घाटमपूर जागेवरून भाजपतर्फे त्यांना उमेदवारी मिळाली होती. ही जागा भाजपकडून जिंकवून आणणाऱ्या त्या पहिल्या आमदार ठरल्या. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहात होत्या.



असा होता कमल राणी वरून यांचा कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रवास


- जन्म- ३ मे १९५८ रोजी लखनऊ येथे


- कमल राणी वरून यांचा विवाह एलआयसी अधिकारी किशन लाल वरूण यांच्यासह झाला


- समाजशास्त्र या विषयात MAची पदवीचे शिक्षण


- १९८९ पहिल्यांदा कमल राणी यांना द्वारकापुरी प्रभागातून कानपूर नगरसेवकपदाचे तिकट मिळाले


- कमल राणी यांनी त्यावेळी ही जागा जिंकूण भाजपचा झेंडा महानगरपालिकेत रोवला.


- १९९५ मध्ये त्याच प्रभागातून पुन्हा नगरसेवकपदी निवडून आल्या.


- १९९६ मध्ये भाजपाने त्यांना घाटमपूर (आरक्षित) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.


- लोकसभेवर पोहोचलेल्या कमल राणी यांनीही १९९८ मध्ये याच जागेवरुन पुन्हा विजय मिळविला.


- १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा बसपाचे उमेदवार प्यारेलाल संखवार यांचा केवळ ५८५ मतांच्या फरकाने
पराभव केला.


- खासदार असताना कमल राणी यांनी कामगार व कल्याण, उद्योग, महिला सशक्तीकरण, राज्यभाषा आणि पर्यटन
मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमध्ये राहून काम केले.



Powered By Sangraha 9.0