‘अखंड भारत’च का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2020
Total Views |


Akhand Bharat_1 &nbs



राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असलेले लोक १४ ऑगस्ट हा दिवस एक ‘काळा दिवस’ म्हणून पाळून या दिवशी ‘अखंड भारत संकल्प दिन’ म्हणून साजरा करतात. परंतु, परिस्थती अशी आहे की, मोजकेच लोक सोडल्यास अनेकांना या ‘अखंड भारता’चे महत्त्व माहिती नाही आणि ते त्याचा विचारसुद्धा करत नाही. त्यामुळे ‘अखंड भारत’च का? आणि त्यामागची वैचारिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी हा प्रपंच.



उद्या, शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र्याचे ७४ वे वर्ष साजरे करेल. अर्थात, स्वातंत्र्याच्या सुखाबरोबरच फाळणीची सतत भळभळणारी जखम ब्रिटिश जाता जाता आपल्या पदरात टाकून गेले. त्या जखमेच्या वेदना आजसुद्धा आपण भोगत आहोत. स्वातंत्र्य जरी १५ ऑगस्ट रोजी मिळाले असले तरी देशाची फाळणी ही त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे १४ ऑगस्ट, १९४७ रोजी झाली होती.

राष्ट्रवादी विचारांच्या कित्येक भारतीयांच्या रोषाला डावलून तत्कालीन नेतृत्वाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली आणि देशाचे तुकडे पडले. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असलेले लोक १४ ऑगस्ट हा दिवस एक ‘काळा दिवस’ म्हणून पाळून या दिवशी ‘अखंड भारत संकल्प दिन’ म्हणून साजरा करतात. परंतु, परिस्थती अशी आहे की, मोजकेच लोक सोडल्यास अनेकांना या ‘अखंड भारता’चे महत्त्व माहिती नाही आणि ते त्याचा विचारसुद्धा करत नाही. त्यामुळे ‘अखंड भारत’च का? आणि त्यामागची वैचारिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी हा प्रपंच.
‘अखंड भारत’च का, हे समजून घेण्यासाठी फाळणीची कारणं समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व तत्कालीन महापुरुषांबद्दल पूर्ण आदर ठेवून इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे गरजेचे आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे नेहमी सांगायचे की, ”We are a nation in the making’’ म्हणजेच आम्ही राष्ट्र व्हायच्या प्रक्रियेत आहोत. दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचे खरं कारण हेच आहे की, ब्रिटिशांनी यशस्वीपणे ते इथे यायच्या आधी आपण ‘राष्ट्र’ नव्हतो, ही भावना आपल्या समाजमनात रुजवली. परंतु, प्राचीन इतिहास पहिला तर भारत राष्ट्राचे पुरावे हे महाभारत काळापासून ते सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातदेखील सापडतात. मात्र, इंग्रज इथली राष्ट्रीयत्वाची भावना मिटविल्यावर खर्‍या अर्थाने हिंदू-मुस्लीम वादाला सुरुवात झाली. भलेही इथे निरनिराळे धर्म, निरनिराळी संस्थाने, संप्रदाय, भाषा, पेहराव, आहार यात भिन्नता असेल. परंतु, ही सर्व विविधता सिंधू नदीच्या खोर्‍यात उगम झालेल्या हिंदू संस्कृतीने बांधली गेली आहे. याच एकतेच्या सूत्रातून १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्यसमराच्या वेळी ‘हिंदुस्तानचा बादशाह’ म्हणून शेवटचा मुघल शासक बहादुरशाह याच्या नावाची द्वाही फिरविण्यात आली होती. तेव्हा सर्व राष्ट्राने त्यांना देशाचा बादशाह म्हणून स्वीकारलं होतं याचेच ते द्योतक आहे.
ब्रिटिशांच्या या दुष्ट हेतूची कल्पनेचे मूळ हे १९०५च्या तत्कालीन बंगालच्या फाळणीमध्ये मिळते. यातूनच त्यांच्या कुटिल डावाचा अंदाज आपल्या नेतृत्वाला यायला हवा होता आणि त्यांनी त्यातून योग्य तो धडा शिकण्याची गरज होती. मात्र, या विरोधात उठलेल्या प्रचंड जनक्षोभापुढे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली होती. या वंगभंग आंदोलनामुळे मिटलेली हिंदू-मुस्लीम दुही ही ब्रिटिश सरकारला घातक होती. याच्या पुढची पायरी अनाठायी मुस्लीम तुष्टीकरणाची आहे. अर्थात, मुस्लीम समाजाला राष्ट्रीय लढ्यात सामवून घेणे हा त्यामागे असलेला दृष्टिकोन कितीही शुद्ध असला तरी त्यामागे केल्या गेलेल्या कृती या तितक्याच निंदनीय होत्या. यातूनच इंग्रजांच्या प्रेरणेने इस्लामिक गुरु आगा खान यांनी वेगळ्या मुस्लीम मतदारसंघाची मागणी रेटली, ज्यालाच ‘मोर्ले-मिंटो सुधारणा’ म्हटले जाते. ही मागणी द्विराष्ट्र संकल्पनेची पायाभरणी होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यानंतर झालेल्या खिलाफत आंदोलनामुळे या मागणीला अजूनच बळ आले. आज आपणासाठी महमंद अली जिना हे जरी फाळणीचे खरे सूत्रधार असले तरी, महात्मा गांधी आणि तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने कायमच जिनांना उपेक्षित ठेवले आणि आगा खान आणि अली खान यांच्यासारख्या कट्टरवादी लोकांना मुस्लीम समाजाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून मान्यता देऊन टाकली. यामुळेच एकेकाळचे राष्ट्रवादी जिना कट्टर विघटनवादी नेते झाले. यानंतर झालेल्या १२८च्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात जिनांनी १४ कलमी मागण्या रेटल्या, ज्यात अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानची मागणी होती. यानंतर झालेल्या प्रत्येक राजकीय घटनेने या मागणीला बळच दिले आणि ज्याची परिणीती १४ ऑगस्टला भारताच्या फाळणीत झाली.
काँग्रेसकडून नेहमी असा युक्तिवाद केला जातो की, लीगच्या हटवादी आणि हिंसक अशा ‘Direct Action’च्या कारवायांमुळे फाळणीला होकार द्यावा लागला. मात्र जर का हे मान्य केले नसते तर जास्तीत जास्त काय झाले असते? गृहयुद्ध ना! ते तर फाळणी झाल्यावर सुद्धा झालंच की! उलट जास्त रक्तपात या अघोषित गृहयुद्धामुळे झाला. जगातली पहिली आधुनिक लोकशाही म्हणवल्या जाणार्‍या अमेरिकेतसुद्धा गुलामगिरीच्या प्रश्नावरून असाच प्रसंग उद्भवला होता. मात्र, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी विभाजन का गृहयुद्ध, या प्रश्नापेक्षा देशाच्या अखंडतेला महत्त्व दिले आणि आज इतिहास आपल्या डोळ्यांसमोर आहे. उच्चशिक्षित नेहरू आणि इतर काँग्रेसवर्ग हा इतिहास कसा काय विसरले, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. लिओनाड मोस्ले यांना पंडित नेहरू यांनी दिलेल्या उत्तरात नेहरू म्हणतात, “वास्तविकता ही आहे की, आमचे वय झाले होते. संघर्ष करून आम्ही थकलो होतो. फाळणीला विरोध केला असता तर आम्हाला स्वातंत्र्यासाठी अजून काही वर्षं वाट पाहावी लागली असती व त्याला आमची मानसिक तयारी नव्हती. जर अखंड भारताच्या आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या १९३०च्या लाहोर ठरावावर कायम राहिली असती तर परिस्थिती बदलून गेली असती.”
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, फाळणीच्या प्रस्तावाला काँग्रेसने मंजुरी दिल्यावरच मुस्लीम समाज लीगच्या पाठीशी उभा राहिला. तत्पूर्वी २५ टक्क्यांपेक्षादेखील कमी लोक हे लीगचे समर्थक होते. १९४५च्या निवडणुकीत लीगला प्रस्तावित पाकिस्तानच्या भागात स्वबळावर सरकार बनवू शकतील इतकेदेखील बहुमत नव्हते. तसेच इंग्रजांची मानसिक स्थिती ही कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर भारत सोडण्याची होती. म्हणजेच काँग्रेस जर अखंड भारतावर ठाम राहिली असती तर लीगच्या मागण्या फेटाळून इंग्रजाना स्वातंत्र्य देणे भाग पडले असते.
‘अखंड भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण उपखंडातल्या नागरिकांमध्ये सांस्कृतिक एकात्मतेची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक जणांच्या मनात हे व्यवहार्य नाही अशी भावना असते. मात्र जर्मनी, व्हिएतनाम यांची उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. या भारतभूमीत प्राचीन काळापासून राष्ट्रजीवन चालत आलेले आहे, हे विसरून चालणार नाही. अर्थात, अखंड भारत संकल्पनेला मानणार्‍यांची संख्या कमी असली तरी, ‘Determined minority makes history’ हे विसरून चालणार नाही. अशा प्रकारचा विषय मोठा काळ लोकांच्या मनात जीवंत ठेवण्याचे काम आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर काही संघटना करत आहे. भारत पुन्हा अखंड होईल हे निश्चितच आहे. परंतु, हे केव्हा होईल हे आमच्या पुरुषार्थावर आणि प्रयत्नांवर अवलंबून आहे.
 
संदर्भ: १. अखंड भारत- लेखक रमाकांत मंत्री
२. राष्ट्र- माधव सदाशिव गोळवलकर
 

- सुमेध हिंगे

@@AUTHORINFO_V1@@