उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे परमेश्वराकडे साकडे
मुंबई : महाविकास आघाडीतील नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी परीक्षांच्या तिढ्यावर हतबल होऊन परमेश्वराकडेच साकडे घातले आहे. युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परीक्षा घेण्यासंदर्भात राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यातच शिक्षणमंत्र्यानीच अशाप्रकारे गाऱ्हाणे घातल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षांचा तिढा सुटणार कधी, असा प्रश्न आता विद्यार्थी विचारत आहेत.
आपल्या गाऱ्हाण्यात उदय सामंत म्हणतात,
"बा देवा महाराजा, व्हय महाराजा !
ह्यो जो काय कोरोनाचो राक्षस देशात आणि माझ्या महाराष्ट्रात थैमान घालता हा त्येचो कायमचो बंदोबस्त कर रे महाराजा.
पॉझिटीव्ह इले तेंका निगेटीव्ह कर, निगेटीव्ह आसत त्येंका सुखरुप ठेव रे महाराजा
माझ्या पोरांच्या परिक्षेचो तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा...
चाकरमान्यांका गणपतीचा दर्शन होऊ दि रे महाराजा...
हेच्यात जो कोणी आडो इलो तर तेका उभो कर, उभो इलो तर तेका आडवो कर रे महाराजा
एकाचे एकवीस कर पाचाचे पंचवीस कर पण माझ्या भारताक महाराष्ट्राक लवकरात लवकर कोरोना मुक्त कर रे महाराजा
व्हय महाराजा
"