कोरोनाच्या लक्षणात ‘या’ दोन नव्या लक्षणांची भर!

13 Jun 2020 19:14:49

corona _1  H x


आरोग्य मंत्रालयाने जारी केली माहिती

नवी दिल्ली : कोरोना लक्षणांमध्ये आणखी काही संभाव्य लक्षणांचा आरोग्य मंत्रालयाकडून समावेश करण्यात आला असून कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये अचानक वास घेण्याची, चव घेण्याची शक्ती नष्ट होणे या लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. कोरोनाची नवी लक्षणे तोंडाची चव जाणे, कोणत्याही प्रकारचा वास, गंध न येणे ही असल्याचे सांगण्यात आले आहे.


यासंदर्भात एका विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषत: कोरोना संबंधित ही लक्षणे नाहीत. कारण व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमता फ्लू, ताप किंवा इन्फ्लूएन्झामुळेही (शीतज्वर) बिघडते. पण कोरोनाची ही प्राथमिक लक्षणे असू शकतात. ही लक्षणे आढळल्यास त्यानुसार, त्वरित उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते.


भारतात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत जाणे यास मुख्य कारण अनेकदा या विषाणूचे निदान लवकर न होणे हे आहे. लोकांना सर्दी, खोकला, ताप आल्यास तो वायरल आहे असे समजून ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम लोकांना कोरोनाची लागण होत आहे. सर्दी, खोकला, कफ, स्नायू दुखी, घसा खवखवणे, नाक गळणे, अतिसार ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता यात बेचव होणे आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे या दोन लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून त्यानुसार लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0