मुंडे साहेब लवकर बरे व्हा ! कार्यकर्त्यांची प्रार्थना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2020
Total Views |
Dhanjay Munde _1 &nb



धनंजय मुंडे हे योद्धा आहेत, लवकर बरे होतील : राजेश टोपे



मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याला पुष्टी दिली. मुंडे यांच्या दोन चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी एक अहवाल पॉझिटीव्ह तर दुसरा निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे मुंडे लवकरच कोरोनावर मात करतील, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. मुंडे यांच्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली आहे, मुंडे साहेब बरे व्हा !, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. 


धनंजय मुंडे बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीला होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापण कार्यक्रमालाही होते. मात्र सर्व बैठकी सोशल डिस्टंसिंग ठेऊनच झालेल्या आहेत. अजित दादांच्या कडक शिस्तिमुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही सोशल डिस्टंसिंग ठेवले जाते. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. जर कोणाला तशी लक्षणे जाणवली तर त्याची चाचणी घेण्यात येईल, अशी माहितीही टोपे यांनी दिली.




 
 

@@AUTHORINFO_V1@@