चीन आणि पाकिस्तानचे भारताविरोधात ‘हायब्रीड युद्ध’

16 May 2020 23:21:39

indo china_1  H

पाकिस्तान आणि चीन यांचे भारताशी असलेले वैर हे जगजाहीर आहे. त्यामुळे इतके वर्षं हे देश भारताला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनचा आक्रमक पवित्रा आपल्याला माहीतच आहे. परंतु, २०१९ मध्ये ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसर्‍यांदा निवडून आले, त्यानंतर या दोन्ही देशांनी भारताच्या विरुद्ध ‘हायब्रीड युद्ध’ सुरू केले आहे.

गेल्या आठवड्यामध्ये चीनने भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनची हेलिकॉप्टर्स लडाखमध्ये आली होती. त्यांना परतवण्यासाठी भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने आकाशात झेपावली. एवढेच नव्हे, तर ज्या चिनी सैनिकांनी आत घुसखोरी केली होती, त्यांना भारतीय सैन्याने धक्के मारून पिटाळूून लावले. भारतीय सैन्याच्या एका लेफ्टनंट दर्जाच्या अधिकार्‍याने एका चिनी मेजरला कसे रक्तबंबाळ केले, याविषयी सोशल मीडियावर अनेक पोस्टही व्हायरल झाल्या आहेत. पाकिस्तान आणि चीन यांचे भारताशी असलेले वैर हे जगजाहीर आहे. त्यामुळे इतके वर्षं हे देश भारताला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनचा आक्रमक पवित्रा आपल्याला माहीतच आहे. परंतु, 2019 मध्ये ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसर्‍यांदा निवडून आले, त्यानंतर या दोन्ही देशांनी भारताच्या विरुद्ध ‘हायब्रीड युद्ध’ सुरू केले आहे. सध्या काश्मीर प्रश्नावर सगळं जग हे भारताच्या बाजूने आहे. पारंपरिक लढाई करण्याची पाकिस्तानची क्षमता नाही, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला काश्मीर खोर्‍यामध्ये फारसे यश मिळत नाही, कारण भारतीय सैन्याची आक्रमक कारवाई. म्हणून भारताशी लढण्याकरता ‘हायब्रीड युद्ध’ हा एक अतिशय चांगला पर्याय आहे.


‘हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे, ज्यात पारंपरिक युद्ध हे राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध आणि मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘हायब्रीड वॉरफेअर’ मुत्सद्देगिरी आणि निवडणूक हस्तक्षेप यासारख्या इतर प्रभावी पद्धतींसह एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही, तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. या युद्धात अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरविल्या जातात. सतत हे केल्याने सर्वसामान्यांचा विचार बदलू लागतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात तसे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे.



लष्करी दबाव, आर्थिक युद्ध, कर्जबाजारी करून दबाव टाकणे


चीनला इतर देशांवर लष्करी दबाव टाकून, आर्थिक युद्ध करून, त्या देशाला कर्जबाजारी करून किंवा मानसिकदृष्ट्या दमदाटी करून घाबरवून टाकायला आवडते. त्यामुळे हे देश चीनचे ऐकतात आणि त्यांचे आर्थिक गुलाम बनण्याकरिता तयार होतात. परंतु, चीनची हीच दमदाटी भारताविरुद्ध फारशी उपयुक्त ठरलेली नाही. म्हणून त्यांनी लष्करी ताकदीचा वापर डोकलाममध्ये केला. पण, तिथे त्यांना फारसे यश मिळाले नाही, म्हणून आता ते ‘हायब्रीड युद्धा’चा पर्याय भारताविरुद्ध वापरत आहेत. 
एवढेच नव्हे, तर चीन आणि पाकिस्तान या दोघांनाही सध्याचे भारत सरकार आवडत नाही. चीनला वाटते की, कोरोनानंतर भारत चीनला शह देण्याकरिता एक महत्त्वाचा देश म्हणून जगाच्या समोर एक पर्याय म्हणूनच उभा राहतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने पाकिस्तान आणि चीनच्या विरुद्ध एक आक्रमक धोरण सुरू केले आहे आणि मागच्या सरकारच्या घाबरट पद्धती आता बंद केल्या आहेत. पाकिस्तानच्या कुठल्याही दहशतवादी हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर कसे दिले जाते, हे आपल्याला माहिती आहेच. आता पाकिस्तानकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत. चीनसोबतसुद्धा आपण एक आक्रमक धोरण वापरत आहोत.



‘डिप्लोमसी’ची लढाई


अशा अनेक कारणांमुळे चीन आणि पाकिस्तान भारताच्या विरुद्ध ‘हायब्रीड युद्ध’ जास्त प्रमाणामध्ये वापरतात. या युद्धाचे तसे अनेक पैलू आहेत. त्यामधल्या काही पैलूंवर आपण लक्ष केंद्रित करू. पहिला पैलू म्हणजे ‘डिप्लोमसी’ची लढाई. यामध्ये चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या जागतिक संस्थांमध्ये भारतास कसा त्रास देतो, हे आपल्याला माहीत आहे. उदाहरणार्थ, ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन फोर्स’मध्ये पाकिस्तानला एक दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करायला अडथळा आणणे, हे त्याचे उत्तम उदाहरण.


राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करणे


चीनचे दुसरे शस्त्र आहे आपल्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ. अशा प्रकारची ढवळाढवळ सोव्हिएत रशियाने 60-70च्या दशकात केली होती. ‘मिट्रोव्हीन’ या केजीबी एजंटच्या पुस्तकामध्ये भारतात नेमके काय केले होते, यावर एक पूर्ण प्रकरण लिहिले आहे. त्यात दिलेली माहिती धक्कादायक आहे. हे पुस्तक इंटरनेटवरही उपलब्ध आहे. सध्या पाकिस्तान आणि चीनने भारताच्या राजकीय पक्षांमध्येसुद्धा ढवळाढवळ करणे सुरू केले आहे. त्यांचे राजदूत काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटतात आणि मुत्सद्देगिरीच्या नावाखाली त्यांना चीनमध्ये भेटीकरिता बोलावले जाते. तिबेटला किंवा मानससरोवरला भेट, पाकिस्तानमध्ये लाहोरला भेट. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाकिस्तानी आणि चिनी मीडियाला दिलेल्या मुलाखती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यामध्ये दिसेल की हे नेते भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध बोलत आहेत.



राष्ट्रीय हिताविरुद्ध लिहिणारे तथाकथित विद्वान


एवढेच नव्हे, तर मीडियातील सरकारच्या विरुद्ध असलेल्या अनेक पत्रकारांना चीन आणि पाकिस्तानला भेटीसाठी बोलावले जाते आणि त्यानंतर त्यांच्याकडून सरकारच्या विरुद्ध आणि भारतीय राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध लेख लिहून घेतले जातात. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये खासकरुन अमेरिका आणि युरोपमधील वेगवेगळी वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चॅनेल्सवर मुलाखती प्रकाशित होतात. ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’विरुद्ध भारतात कशी हिंसात्मक निदर्शने केली गेली, हे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चांगल्या पद्धतीने झळकले. डाव्या पक्षांच्या प्रभावाखाली असलेल्या काही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जसे की जेएनयु, जामिया, दिल्ली विद्यापीठ किंवा जाधवपूर विद्यापीठ यांनी भारताच्या हिताविरुद्ध कसा हिंसाचार केला, हे आपल्यासमोरच आहे. यांना अर्थातच चीनचे समर्थन आहे.



देशात हिंसात्मक आंदोलने, अराजकता निर्माण करणे


दुर्दैवाने, राजकीय लढाईमध्ये भारताचे काही राजकीय पक्ष चीन आणि पाकिस्तानला सामील झाले आहेत का, असा संशय निर्माण होतो. कारण, या राजकीय पक्षांचा आणि पाकिस्तान आणि चीनचा उद्देश एकच आहे की, सध्याच्या सरकारला हिंसात्मक आंदोलने, अराजकता निर्माण करून उलथवून लावायचे आणि भारतामध्ये सरकार आणायचे, जे चीन आणि पाकिस्तानधार्जिणे असेल. चीनने याआधी ईशान्य भारतामध्ये बंडखोरी करणार्‍यांना, मध्य भारतात माओवाद्यांना कशी मदत केली आहे, हे आपण जाणतोच. परंतु, सध्या चीन सायबर युद्धामध्ये भारतातील काही सरकारी संकेतस्थळे हॅक करुन माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहे. अशी मदत चीन पाकिस्तानलासुद्धा देत आहे. पाकिस्तान भारताच्या विरुद्ध कसे ‘प्रपोगंडा युद्ध’ किंवा दुष्प्रचार युद्ध लढत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. यामध्ये एकच अपप्रचार केला जातो की, काश्मीरखोर्‍यामध्ये भारतीय सैन्य तिथल्या जनतेवर अत्याचार करत आहे किंवा भारतामध्ये मुस्लीम समाज हा सुरक्षित नाहीच आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. या ‘हायब्रीड युद्धा’ला कसे उत्तर द्यायचे?


भारताने काय करावे?


स्वसंरक्षण हे नेहमीच कठीण असते. परंतु, अशाप्रकारची ऑपरेशन्स आपणसुद्धा चीन आणि पाकिस्तानमध्ये करू शकतो. त्यांना सांगू शकतो की, तुम्ही आमच्या राजकीय पक्षांमध्ये हस्तक्षेप केला, तर आम्हीसुद्धा पाकिस्तानमध्ये असलेले राजकीय पक्ष किंवा पाकिस्तानातील सिंध, बलुचिस्तान किंवा वजिरिस्तानमधील वेगवेगळ्या संस्थांशी मिलाप करून त्यांना भारतामध्ये येण्याकरिता निमंत्रण देऊ शकतो. चीनच्या विरुद्ध असलेले काही प्रांत म्हणजे तिबेट, शिनझियांग, हाँगकाँग इथल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांना आम्ही राजकीय मदत करू शकतो. त्यांनाही भारतात पर्यटक म्हणून यायला आवडेल. जर चीन भारतातल्या राजकीय पक्षांशी संवाद साधत असेल, तर आम्ही चीनमधल्या शिंजियांग किंवा तिबेटमधील राजकीय नेत्यांशी किंवा चीनमधले असलेले इतर अल्पसंख्याक आणि त्यांच्या संस्था आणि नेत्यांशी संवाद साधू शकतो. चीनला जशास तसे हीच भाषा कळते. म्हणून जर चीन आमच्याविरुद्ध राजकीय युद्ध लढत असेल, तर आम्ही त्यांच्या मानवधिकार संस्था, अल्पसंख्याकांच्या संस्थांशी आणि नेतृत्वांशी बोलून त्यांना राजकीय मदत करू शकतो. हे तुम्हाला आवडेल का? आवडत नसेल तर तुम्ही भारताच्या राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करणे थांबवा.


Powered By Sangraha 9.0