हिंदुजा रुग्णालात कोरोनाबाधित नर्सचे आंदोलन

10 May 2020 18:26:16
Hinduja Hospital _1 




कोरोनायोद्ध्यांवर आंदोलनाची वेळ का आली ?



मुंबई : कोरोनाच्या लढाईत आपल्या प्राणांची पर्वा न करता सेवा देणाऱ्या हिंदुजा रुग्णालयातील नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर आंदोलनाला बसण्याची वेळ आली आहे. उपचार करताना भेदभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, अशा कर्मचाऱ्यांना पालिका रुग्णालयात हलवण्यात येत आहे.




 तिथे योग्य उपचार न मिळत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. हिंदूजा रुग्णालयात सेवा देत असताना काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले. रुग्णालय प्रशासनाने त्यांना पालिका रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितले. "आम्हाला हिंदूजा रुग्णालयातच स्वतंत्र विभागात उपचार घ्यायचे आहेत. इथले कर्मचारी असूनही पालिका रुग्णालयात आम्ही का जावे," असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. "आम्हीही सर्वसामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच आहोत. इथे सेवा दिल्यानेच आम्हाला कोरोनाची लागण झाली आहे."
Powered By Sangraha 9.0