'स्पाईसजेट'च्या विमानाचे रुपांतर मालवाहू विमानात; सिंगापूरहून औषधे आणणार

09 Apr 2020 18:16:18
spicejet_1  H x

सिंगापूर ते बंगळूरू दरम्यान मालाची वाहतूक

प्रतिनिधी (मुंबई) - लाॅकडाऊनमुळे खासगी विमानसेवा बंद असल्याने स्पाईसजेटने मालवाहू विमानसेवा सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी प्रथमच नागरी उड्डाण विमानाचा वापर मालवाहू विमानासारखा करुन दिल्ली ते चेन्नई दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता. उद्या स्पाईसजेटचे हे विमान सिंगापूरहून औषधांचा साठा घेऊन बंगळूरूमध्ये दाखल होणार आहे. 
 
सध्या लाॅकडाऊन सर्व राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय नागरी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या परिस्थितीत खासगी कंपनीने आता नागरी उड्डाणांच्या विमानांचा वापर मालवाहतुकीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नागरी उड्डाणाच्या विमानांमधून करण्यासाठी स्पाईसजेटने 'नागरी उड्डाण मंत्रालया'कडून परवानगी मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतर कंपनीने बोईंग ७३७ हे विमान मालवाहुतकीसाठी तयार केले आहे. गेल्या आठवड्यात या विमानाने दिल्ली ते चेन्नई दरम्यान ११ टन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात गेला. उद्या हे विमान सिंगापूरहून औषधांचा साठा घेऊन बंगळूरूच्या दिशेने रवाना होणार नाही. मालवाहतूक करण्यासाठी या विमानाचा दुसऱ्यांदा वापर करण्यात येत आहे. प्रवासी कक्षामधून सामानाची ने-आण करण्यासाठी फ्लेम-प्रफू मटेरियलपासून तयार केलेले सीट कव्हर वापरण्यात येत आहेत. तसेच जागेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रवासांच्या डोक्यावर असणाऱ्या खणाचा देखील वापर करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0