ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार!

08 Apr 2020 15:48:39

brazil_1  H x W



पत्रात म्हंटले 'रामायणातील हनुमानाप्रमाणे जीवनदान देण्याबद्दल भारताचे आभार'



ब्राझील : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देताना एक पत्र लिहून म्हटले आहे की, ‘रामायणात जसे हनुमानाने संजीवनी देऊन लक्ष्मणाला जीवदान दिले, त्याचप्रमाणे कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात भारताने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ देऊन ब्राझीलला मदत केली आहे.’


कोरोना साथीच्या आजाराचा सामना करत असलेल्या जगातल्या इतर अनेक देशांना ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ उपयुक्त ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांनी मोदी सरकारच्या लॉकडाऊनला सरकारचे धाडसी निर्णय म्हणत भारत सरकारच्या धोरणांचे कौतुक केले आहे. अशाच प्रकारे ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हनुमानासारखे ब्राझीलला जीवनदान दिल्याबद्दल भारताचे आभार मानले.


कोरोना व्हायरस साथीच्या रोगाचा सामना करणाऱ्या अनेक देशांना मलेरिया औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन दिल्यामुळे भारताची जगभरात प्रशंसा झाली आहे. खरं तर, इतर देशांना मदत करण्यासाठी कोरोनावर अत्यंत प्रभावी मानल्या जाणऱ्या या औषधाच्या निर्यातीवरील बंदी भारत सरकारने काढून टाकली आहे. ही मदत ब्राझीलला पोहोचल्यानंतर औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या पुरवठ्याबद्दल अध्यक्ष जैर बोल्सनारो यांनी भारताचे आभार मानले.


गरजू राष्ट्रांना औषधाचा पुरवठा करताना परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ‘कोरोनाव्हायरस साथीच्या वेळी भारताने नेहमीच अशा कठीण परिस्थितीत संपूर्ण जगाला एकत्र लढावे लागेल असे म्हटले आहे.’
Powered By Sangraha 9.0