वॉकहार्ट रुग्णालय परिसर 'कंटेन्टमेंट झोन' म्हणून घोषित!

06 Apr 2020 10:47:15

wockhardt hospital_1 
 


रुग्णालयातील २६ नर्स, ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण


मुंबई : मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४५८ वर पोहोचली आहे. मुंबईतील वॉकहार्ट रुग्णालयातील २६ नर्स आणि ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे वॉकहॉर्ट रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर हा ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.


मुंबई सेंट्रल या परिसरात वॉकहार्ट रुग्णालय आहे. या रुग्णालयात काम करणाऱ्या २६ नर्स आणि ३ डॉक्टरांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णालयातून आतून बाहेर जाण्यास तसेच बाहेरुन रुग्णालयात जाण्यास मनाई करण्यात येत आहे. जोपर्यंत या रुग्णालयातील सर्व रुग्णांचा रिपोर्ट हा जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे.


या रुग्णालयातील २७० नर्से आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. ज्या नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.


या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता. त्याला छातीत काही त्रास होत होता. त्यानंतर या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चार दिवस रुग्णालयात होता. या रुग्णाच्या संसर्गाने या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Powered By Sangraha 9.0