‘कोरोना’ अस्त्राचा जीवघेणा चिनी प्रयोग

16 Apr 2020 20:34:54

China_1  H x W:



 

चीनवर जैविक शस्त्रनिर्मितीचा संशय विनाकारण घेतलेला नाही. कारण, नजीकच्या काही वर्षांत चिनी सैन्य आणि त्याअंतर्गत येणार्‍या संस्थांमध्ये अशाप्रकारच्या घटना घडत आल्या, ज्यांनी चीनला संशयाच्या भोवर्‍यात उभे करण्याचे काम केले.

 


 

विद्यमान परिस्थितीत एका जागतिक संकटाच्या रुपात कोरोना विषाणूने सर्वत्रच आपले हातपाय पसरल्याचे पाहायला मिळते. चीनमधून उद्भवलेल्या कोरोना विषाणूने आज जगातील पाचही खंडांतल्या १९५ देशांना विळखा घातल्याचे दिसते. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या चीन आणि भारतासह सर्वाधिक आर्थिक व शक्तिसंपन्न युरोपातील देश आणि अमेरिकेचाही यात समावेश होतो. आज जगात सर्वाधिक कोरोनाप्रभावित देशांत अमेरिका, इटली आणि स्पेनसारखे पुढारलेले देश आहेतच, पण दुसरीकडे जिथे कोरोनाचा उगम झाला, त्या चीनने अविश्वसनीयरित्या या महामारीवर नियंत्रण मिळवल्याचे सध्यातरी दिसते. चीनच्या कुशल आपत्ती निवारणाचा यातून परिचय मिळतोच, पण त्या देशाचे मनसुबे आणि क्रियाकलापांवर संशयाचे मळभही निर्माण होते.

कोरोना विषाणूच्या प्रकोपावरुन अमेरिकेत चिनी अधिकार्‍यांविरोधात २० ट्रिलियन डॉलर्सचा खटला दाखल करण्यात आला आहे. टेक्सासस्थित बज फोटोजया कंपनीसह अमेरिकन वकील लॅरी केलमॅन व त्यांना कायदेविषयक सेवा पुरवणारा समूह फ्रिडम वॉचने चिनी सरकार, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’, ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’, इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शी झेंगली, चिनी सैन्याचे मेजर जनरल आणि अकॅडमी ऑफ मिलिटरी सायन्सच्या प्रमुख चेन वी यांविरोधात खटला दाखल केला आहे. वुहान व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमधून कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप या सर्वांवर ठेवलेले आहे. पक्षकारांचे म्हणणे आहे की, प्रचंड लोकसंख्येच्या संहारासाठी चीनकडून कोविड-१९विषाणू तयार करण्यात आला. १९२५ साली जैविक शस्त्रास्त्रांवर बहिष्कार घालण्याचे निश्चित करण्यात आले होते आणि अशाप्रकारचे जैविक शस्त्र सामूहिक विनाशाचे दहशतवादी किंव त्या संबंधित शस्त्र असल्याचा उल्लेख केला आहे.

अर्थात, चीनवर जैविक शस्त्रनिर्मितीचा संशय विनाकारण घेतलेला नाही. कारण, नजीकच्या काही वर्षांत चिनी सैन्य आणि त्याअंतर्गत येणार्‍या संस्थांमध्ये अशाप्रकारच्या घटना घडत आल्या, ज्यांनी चीनला संशयाच्या भोवर्‍यात उभे करण्याचे काम केले. वर्तमान संकटकाळात चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान शहर जगाचे केंद्र झाले आहे. वुहानमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीही संस्था या सगळ्या आपत्तीचे उगमस्थान आहे. संस्थेचे प्रत्यक्ष काम विषाणूवर संशोधन करण्याचे आहे. परंतु, अशाप्रकारचे अतिशय संवेदनशील आणि शास्त्रीय महत्त्व असलेले काम थेट सैन्याच्या नियंत्रणात येणे शंकेचा आणि चिंतेचा विषय आहे.

५४ वर्षीय मेजर जनरल चेन वी यांना चीनमधील सर्वाधिक कुशल जैवरसायन विशेषज्ज्ञ मानले जाते आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचेन वी यांच्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करते. दरम्यान, चेन वी या गेल्या काही वर्षांतच प्रख्यात झाल्या किंवा त्यांचे नाव समोर येऊ लागले. परिणामी, चीनमधील प्रसिद्ध विशेषज्ज्ञ झोंग नानशान आणि ली लांजुआन यांच्या पंक्तीत त्या आल्या आणि यामागे त्यांचे कौशल्य तर आहेच, पण चिनी कम्युनिस्ट पक्षाशी असलेली त्यांची जवळीकही आहे. हाँगकाँगस्थित वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार चेन यांनी सार्सआणि मर्ससारख्या आपत्तीवरही काम केले, तर २०१३ साली त्यांनी नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचे प्रतिनिधित्वही केले. तद्नंतर दोन वर्षातच चेन वी यांना सैन्यामध्ये मेजर जनरलच्या रुपात पदोन्नती दिली गेली. २०१८ मध्ये चेन यांना चिनी पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सच्या सदस्या म्हणून निवडले गेले. चिनी पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सही चीनमधील शीर्षस्थ राजकीय सल्लागार संस्था आहे.

सैन्य आणि सरकारची अशाप्रकारच्या संस्थांप्रतिची आपुलकी विनाकारण असू शकत नाही. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीअशा संस्थांच्या साखळीतील एक नाममात्र कडी आहे, जी चीन सरकारच्या जैविक शस्त्रास्त्र कार्यक्रमाचा भाग असू शकते. तथापि, चिनी सरकार, तिथले सैन्याचे पोलादी नियंत्रण आणि चीनमधील माहितीप्रसारणावरील कठोर निर्बंध यांमुळे अशा संस्थांचे वास्तव्य सहजासहजी जगासमोर येत नाही. एवढे असूनही एखादी घटना समोर आलीच, तर चीन सरकार संपूर्ण शक्तीनिशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करते, जसे आताच्या कोरोना प्रकरणातही पाहायला मिळाले.

अशा गंभीर प्रकरणात चीन किती असंवेदनशीलपणे वागू शकतो, याचा दाखला २०१३ पासून २०१६ पर्यंत तिथे झालेल्या वॅक्सीन घोटाळ्याच्या शृंखलेत आपण पाहू शकतो. वरील कालावधीत इथे औषधनिर्मिती संस्था चांगशेंग आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्टद्वारे एका चुकीच्या वॅक्सीनची निर्मिती करण्यात आली आणि त्याला मोठ्या प्रमाणावर लहान लहान बालके बळी पडली. मात्र, हे कांड घडूनही कोणत्याही दुर्घटनेला त्यासाठी जबाबदार मानले गेले नाही. परंतु, चिनी जनतेचे या घटनेकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष आकर्षिले गेले. तथापि, सरकारनियंत्रित माध्यमांनी या विषयावर मौन धारण केलेले होते. परंतु, ‘द किंग ऑफ वॅक्सीनशीर्षकाचा एक लेख या वॅक्सीनघोटाळ्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वी चॅटवर २१ जुलै, २०१८ रोजी प्रकाशित झाला होता. सदर लेखात असे सांगितले गेले की, साधारण एका दशकाहून अधिक काळ इथल्या निर्मात्यांनी अशुद्ध भावनेने काम केले, त्यातून त्यांचा नफाही वाढत गेला. परंतु, दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या कितीतरी क्षेत्रांत चीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. मात्र, तशा क्षमतांचा उपयोग लस सुरक्षेसाठी किंवा त्यावर नजर ठेवण्यासाठी त्याने केला नाही. पुढे याच घटनेनंतर चिनी अधिकार्‍यांनी लाखो लोकांचे जीवन धोक्यात घातले व मुख्य दोषींना शिक्षा करण्यातही हात आखडता घेतला.

दरम्यान, जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचलेल्या या लेखाकडे चिनी शीर्षस्थ नेत्यांचे लगेच लक्ष गेले नाही. परंतु, आपल्या राजकीय निहितार्थांमुळे एका आसन्न राजकीय संकटाची त्यांना चाहूल लागली आणि या संकटावर तोडगा काढण्यासाठी चीन सरकारने दंडात्मक उपाय लागू केले. तसेच जनविरोधाला दडपण्याची दुहेरी रणनीति लागू केली.

अतिमहत्त्वाकांक्षी असलेल्या शी जिनपिंग या अध्यक्षाच्या नेतृत्वात चीन एका आक्रमक रणनीतीचे अनुसरण करत आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाची १९ वी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत निश्चित केलेल्या लक्ष्यांवरुन हे स्पष्ट होते की, चीनची जगाचा मध्यवर्ती केंद्र होण्याची आकांक्षा असून त्यातून मिळणार्‍या तथाकथित डिव्हाइन मॅन्डेटद्वारे जगात आपला झेंडा फडकावण्याच्या तयारीत तो देश आहे. उल्लेखनीय म्हणजे, यासाठी चीन कोणत्याही उपायांचा आधार घेण्यासाठी वा कोणत्याही थराला जाण्यासाठी आतुरलेला आहे. मग ते उपाय भले जगासाठी आणि मानवतेसाठी कितीही मोठा धोका निर्माण करत असले तरीही!

आताची आपत्तीही काळाबरोबर निघून जाईल, पण एका नवीन वैश्विक व्यवस्थेमध्ये चीनची भूमिका नेमकी काय असेल, हा जागतिक समुदायाने विचार करण्याचा काळ असेल.

(अनुवाद : महेश पुराणिक)

Powered By Sangraha 9.0