कोरोनाला पराभूत करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर

11 Apr 2020 20:49:08


arogya setu app_1 &n


'आरोग्य सेतू' अ‍ॅप युजर्सच्या स्मार्टफोनची लोकेशन ट्रॅक करतो. तसेच हे अॅप ब्ल्युटूथच्या माध्यमातून युजर्स कोरोना व्हायरस संसर्ग रुग्णांच्या संपर्कात आहे की नाही, हे तपासता येते तसेच या दोघांमध्ये किती अंतर आहे, याची माहिती उघड होते. या अ‍ॅप्सवर कोविडपासून कसे वाचू शकतो, या संदर्भात टिप्स मिळत राहते.


कोरोनामुळे दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत आहे आणि हजारो लोक संक्रमित होत आहेत. म्हणून देशातील 'लॉकडाऊन'सोबतच सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा अनेक उपाययोजना करत आहे, जेणेकरून हा साथीचा रोगप्रतिबंध शक्य आहे. देशातील कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोरोनाला पराभूत करण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या सर्वांवर बारकाईने लक्ष आहे. कोरोनाला कुठल्याही परिस्थितीत हरवायचे आहे. यासाठी सरकारने कंबर कसली आहे. वैज्ञानिकांचा सल्ला घेऊन केंद्र सरकार या जीवघेण्याव्हायरसला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात मृतांची संख्या आणि कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या फार कमी आहे. कारण, सरकार आणि आम जनतेचे प्रयत्न. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर एक महत्त्वाचा आयाम आहे.

 

मोबाईल अ‍ॅप 'कोरोना कवच'

 

सरकारने काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी एक खास मोबाईल अ‍ॅप 'कोरोना कवच' (Corona Kavach) लॉन्च केले होते. हे मोबाईल अ‍ॅप जनतेच्या वापराकरिता तयार केले आहे, ते चिनी कोरोना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन ठरत आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे, अ‍ॅप सुरू करून लोकांना कोरोना व्हायरसचा धोका किती वाढला आहे, यासंदर्भात माहिती देणे. तसेच कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, ही माहिती देणे. या अ‍ॅपमुळे लोकांना कळू शकेल ते संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत की नाही.

 

वैयक्तिक ओळख प्रकट करणार नाही

 

सरकारने सर्व कोरोना 'पॉझिटिव्ह'चा डेटा तयार केला आहे. हे अ‍ॅप संशयिताची वैयक्तिक ओळख प्रकट करणार नाही. या अ‍ॅपमध्ये तीन कोड आहेत जे हिरवे, पिवळे आणि लाल आहेत. त्यातील 'ग्रीन कोड'चा अर्थ असा आहे की, आपण पूर्णपणे सुरक्षित आहात. 'यलो कोड' म्हणजे आपण संक्रमित चिनी कोरोनाशी संपर्क साधला आहे. त्याच वेळी 'लाल कोड'चा अर्थ असा आहे की, आपण कोरोना संक्रमण बनले आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना 'सोशल डिस्टन्सिंग' आणि घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, देशभरात 'लॉकडाऊन' असल्यानंतरसुद्धा किराणा दुकान, भाजी मंडई, एटीएमसमोर लोकांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. अशांमध्येच आपल्या जवळ असलेली व्यक्ती कोरोनाबाधित तर नाही का? फक्त चाचणी केल्यानंतरच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजते. या अ‍ॅपच्या मदतीने आजूबाजूला कोरोनाबाधित कोणी असेल तर लगेच समजेल.

 

संसर्गजन्य व्यक्ती जवळ आल्यास अलर्ट मिळेल

 

'कोरोना कवच' हे लोकेशन आधारित मोबाईल अ‍ॅप आहे. अ‍ॅण्ड्रॉईड आणि आयओएस वापरणार्‍यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून तयार केले आहे. या अ‍ॅपचे बिटा व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप आणखी प्रभावी करण्यावर केंद्र सरकार प्रयत्न करत असून त्यावर काम सुरू आहे. लोकेशनवर आधारित असलेले 'कोरोना कवच' हे अ‍ॅप वापरकर्ता ज्या जागेवर जाणार ते डिटेक्ट करते. त्या लोकेशनवर जर एखाद्या कोरोनाबाधिताच्या डेटाशी जुळला तर तुम्हाला लगेच अलर्टचे नोटिफिकेशन येईल. या अ‍ॅपमध्ये कोरोनाबाधितांची लोकेशन जोडण्यात आली आहेत. त्या जागी जर अ‍ॅप वापरकर्ता गेल्यास अलर्ट तुम्हाला मिळेल. यामुळे तुम्ही तुमचा आणि इतरांचा बचाव करू शकाल.

 

'आरोग्य सेतू' काय आहे?

 

'कोरोना कवच'नंतर आता सरकारने 'आरोग्य सेतू' अ‍ॅप लॉन्च केले आहे. हे एकप्रकारचे 'कॉम्प्रिहेन्सिव्ह कोविड - ट्रॅकिंग अ‍ॅप' आहे. कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणे, हा या अ‍ॅपचा प्रमुख उद्देश आहे. सध्या हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 'आरोग्य सेतू' अ‍ॅप हे सरकारने आवश्यक आरोग्य सेवांना देशातील लोकांशी जोडण्यासाठी तयार केल्याची माहिती गुगल स्टोअरवर देण्यात आली आहे. हे अ‍ॅप आपल्याला गुगल प्ले आणि अ‍ॅपल स्टोअरमधून डाऊनलोड करता येते. याद्वारे युझर्सना कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावं आणि त्याच्याशी निगडित सल्ले देण्यात येतात.

 

ब्ल्युटूथ, जीपीएसचा वापर

 

'आरोग्य सेतू' अ‍ॅप ब्ल्युटूथ आणि जीपीएसचा वापर करते. जीपीएसद्वारे व्यक्तीचे रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येते. तसेच कोणतीही कोरोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे अ‍ॅप तिला ट्रॅक करते. सहा फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप व्यक्तीला ट्रॅक करू शकते. केंद्र सरकारकडे असलेल्या पूर्ण डेटाबेसचा अ‍ॅक्सेस या अ‍ॅपला मिळतो. 'आरोग्य सेतू' अ‍ॅप युजर्सच्या स्मार्टफोनची लोकेशन ट्रॅक करतो. तसेच हे अ‍ॅप ब्ल्युटूथच्या माध्यमातून युजर्स कोरोना व्हायरस संसर्ग रुग्णांच्या संपर्कात आहे की नाही, हे तपासता येते तसेच या दोघांमध्ये किती अंतर आहे, याची माहिती उघड होते. या अ‍ॅप्सवर कोविडपासून कसे वाचू शकतो, या संदर्भात टिप्स मिळत राहते. 'आरोग्य सेतू' मोबाईल अ‍ॅपमध्ये एक 'चॅटबॉक्स' आहे. जो युजर्संना या व्हायरससंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. तसेच युजर्समध्ये या व्हायरसची लक्षणे आहेत की नाही, हे सांगितले जाते. या अ‍ॅपमध्ये अनेक राज्यांचे हेल्पलाईन नंबर्स आहेत. 'कोरोना कवच' या अ‍ॅपप्रमाणेच यात फोन क्रमांकाद्वारे रजिस्टर करावं लागते. त्यानंतर हे अ‍ॅप एक ओटीपी पाठवेल. त्यानंतर तुमचं नाव, वय अशा प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. जोपर्यंत मोबाईलचे लोकेशन ट्रॅकिंग सुरू आहे तोवर हे अ‍ॅप ट्रॅक करत राहणार आहे. तसंच तुम्हाला फोनचे ब्ल्युटूथही सुरू ठेवावे लागणार आहे.

 

११ भाषांमध्ये उपलब्ध

 

यामध्ये कोविडच्या ट्रॅकिंगव्यतिरिक्त अन्य फीचर्सही देण्यात आले आहेत. तसेच नजीकच्या कोविड हेल्पसेंटरबाबतही माहिती देण्यात आली आहे. हे अ‍ॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे अ‍ॅप फक्त चार दिवसांत १० दशलक्षांहून अधिक वेळा डाऊनलोड केले गेले आहे.

 

'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'

 

'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग' हा कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यामुळे 'सोशल डिस्टन्सिंग' मोठ्या प्रमाणात पाळली जाते. या दरम्यान अनेक जण आपली कामे 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे करीत आहेत. बिजनेस मीटिंग, कार्यालयातील मीटिंगसाठी याचा मोठा फायदा मिळत आहे. भारत सरकारने या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मोठी मदत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'ची मदत घेत आहेत.

 

'वर्क फ्रॉम होम'

 

देशातील अनेक खासगी कंपन्यांनी तसेच सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी 'वर्क फ्रॉम होम' करायला सुरुवात केली आहे. यामुळे एका झटक्यात गर्दी कमी झाली. रेल्वेचा प्रवास, बसचा प्रवास रोखण्यात आल्याने संसर्गाची वाढ रोखण्यात 'वर्क फ्रॉम होम'चा मोठा फायदा झाला आहे.

 

ड्रोनचा वापर

 

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जगातील अनेक देशांत ड्रोनच्या माध्यमातून औषधापासून सॅनिटायझर, मास्क पोहोचवले जात आहे. भारतात ड्रोनच्या माध्यमातून मास्क आणि औषधी पुरवली जात नसली, तरी भारत सरकार या ड्रोनच्या माध्यमातून संसर्गजन्य ठिकाणांवर लक्ष (वॉच) ठेवण्याचे काम करीत आहे. संसर्गजन्य क्षेत्रात सॅनिटायझरची फवारणीसुद्धा भारत सरकारकडून केली जात आहे.

 

विषाणूचे 'ट्रॅकिंग सॉफ्टवेअर' सार्क देशांना

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच या विषाणूचे 'ट्रॅकिंग सॉफ्टवेअर' सार्क सदस्य देशांना दिले आहे. ज्यात शेजारी पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, मालदीव आणि बांगलादेश आहेत. या अ‍ॅपमुळे स्टेज-२ मधील वापरकर्त्यांच्या स्थानांवर सतत नजर ठेवून चिनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नातून 'कम्युनिटी ट्रान्समिशन' तपासता येते. हे वापरकर्त्यांना चिनी कोरोना 'पॉझिटिव्ह' असल्याचे आढळून आले आहे की नाही, हे तपासण्यात मदत करते. यामुळे या देशांतून भारतात कोरोना प्रवेश करणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी हे सगळे अ‍ॅप डाऊनलोड करून चिनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये देशाला मदत करावी. अजून अनेक प्रकारचे तंत्रज्ञान लढ्याकरता वापरले जात आहे. त्यांच्याविषयी पुढच्या लेखांमध्ये.

 
 
 
Powered By Sangraha 9.0