भाजपने आपदा निधीत जमा केल्यावर तुमच्या बुडाला आग का ?
मुंबई : भाजप आमदारांनी त्यांचे वेतन आपदा निधीमध्ये जमा करून मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावर सत्ताधारी पक्षांनी टीका करत ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत का दिली नाही, असा जाब विचारला होता. आता अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर खरपूस टीका केली आहे. मग आता भाजपने तेच केले तर संजय राऊत तुमच्या बुडाखाली एवढी आग का लागावी? अग्रलेख लिहिताना जरा तुमच्याच पक्षाची कर्म तपासत जा?', अशा शब्दांत समाचार घेतला आहे.
शिवसेना आमदारांनी पूराच्या काळात शिवसेना मदतनीधीत आपले वेतन जमा केले होते. याची आठवण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आमदार भातखळकर यांनी करून दिली आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले उद्योगधंदे आणि त्यावर पोट असणाऱ्या मजूरांना भाजपतर्फे महाभोजन योजनेअंतर्गत जेवण दिले जाणार आहे. या काळात इतर अत्यावश्यक वस्तूंचेही वाटप केले जाणार आहे.