हिंगणघाट निर्भयावर अद्ययावत रुग्णालयात उपचार व्हावे : चित्रा वाघ

04 Feb 2020 18:12:39

chitra wagh _1  





मुंबई
: सोमवारी वर्धामधील हिंगणघाट येथे शिक्षक तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केले कि, “राज्य शासनाने वर्ध्यातील निर्भयाच्या संपूर्ण उपचाराचा खर्च करावा. तिच्यावर अद्यावत रुग्णालयात उपचार करावे व तिचा जीव वाचवावा.” संपूर्ण राज्यातून या घृणास्पद घटनेचा निषेध केला जात आहे.




काल देखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा निषेध करत म्हंटले होते, "राज्यामध्ये कायद्याचे धिंडवडे निघत आहेत. विकृतांना कायद्याची पोलिसांची भिती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये स्वत: लक्ष घालून आरपीवर कडक कारवाई करावी आणि पिडीतेला न्याय मिळवून द्यावा." अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, 'महिला सुरक्षा फक्त भाषणात नको तर प्रत्यक्षात हवी ही राज्यातील भगिनींना अपेक्षा आहे.' असा टोलादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला होता.

Powered By Sangraha 9.0