बहुजन हिताय, बहुजन सुखाय।

08 Dec 2020 18:09:49

Ravindra Joshi _1 &n
 
 
 
 
कोरोनाकाळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी यांनी समाजकार्यात योगदान दिले. कोरोना व त्यामुळे आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली होती. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदत ही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...



रवींद्र गणपत जोशी
राजकीय पक्ष : भाजप
पद : कामोठे शहराध्यक्षसंपर्क क्र. : ७५०६०२७७९०

 
 
 
कोरोना सुरू झाल्यावर सुरुवातीला रवींद्र जोशी हे आपल्या विभागात फिरून लोकांना काळजी घेण्याबाबत माहिती देत होते. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांचे होणारे हाल पाहून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आपण घरात न बसता बाहेर पडून मदत करायला पाहिजे, असे आवाहन केल्यावर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत देण्यास सुरुवात केली. आ. प्रशांत ठाकूर यांनी आपल्याला नेहमी उपयोगी पडणार्‍यांची यादी तयार करण्यास सांगितली, त्याप्रमाणे यादी तयार केली. त्यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप सुरू केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्कचे, सॅनिटायझरचे वाटप, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले.
 
 
 
 
भारतीय जनता पक्ष आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे ‘मोदी किचन’ सुरू करण्यात आले. त्या ठिकाणी दहा हजार लोकांना जेवण उपलब्ध करून दिले. ११ हजार मास्कचे कामोठेमध्ये वाटप केले. ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे तीन हजार लोकांना वाटप केले. गणपतीसाठी अडीच हजार लोकांना घरात गोडधोड बनविण्यासाठी किटचे वाटप केले. या काळात अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून वाटप करीत होते. त्यांचा रिपोर्ट कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आल्याने वाटप करताना अडचणी येत होत्या. त्यावर मात करून त्यांनी वाटप सुरू ठेवले.
 
 
 

Ravindra Joshi _4 &n 
 
 
 
“कामोठे हे दाट लोकवस्तीचे शहर. येथील बहुसंख्य नागरिक मुंबईला नोकरी-धंद्यासाठी जातात. त्यामुळे त्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मास्क वापरणे आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे गरजेचे आहे. त्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे.”
 
 
 
पनवेल महापालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्या दिराला रात्री श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यावेळी कामोठेमध्ये असलेल्या रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हता. पक्षाचे कार्यकर्ते सगळीकडे चौकशी करीत होते. त्यांची परिस्थिती गंभीर होती. रात्री उशिरापर्यंत बेड उपलब्ध झाला नाही, त्यावेळी आपण आपल्याच कार्यकर्त्याला बेड उपलब्ध करू शकत नाही, याची खंत वाटली. आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने रात्री उशिरा नवी मुंबईत नेरुळला डी. वाय. पाटीलमध्ये बेड उपलब्ध झाला आणि त्यांचे प्राण वाचल्याचे समाधान मिळाले.
 

Ravindra Joshi _3 &n 
 
 
रवींद्र जोशी यांना त्यांच्या घरातून या कामात पाठिंबा होता. त्यांना घरून काळजी घेण्यास सांगितले जात होते, त्यातच त्यांचा रिपोर्ट कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यांनाही बेड मिळत नव्हता. पण, नंतर बरे झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा त्याचे जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली. या कार्यात त्यांना पक्षाचे कार्यकर्ते सरचिटणीस सुशील शर्मा, शहर उपाध्यक्ष सुजीत पुजारी, विनोद आटपाडकर, हर्षवर्धन पाटील, रमेश तुपे, शशिकांत भोपी, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस जयश्री धपाटे, कामोठे शहर चिटणीस वैशाली जगदाळे हे नेहमी मदत करीत होते.
 


Ravindra Joshi _2 &n 
 
 
 
 
कामोठेमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय लोक राहतात. त्यांच्यासाठी सुसज्ज हॉस्पिटलची गरज असल्याने भारतीय जनता पक्षातर्फे आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे कामोठे येथे सुसज्ज हॉस्पिटलसाठी पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे पुन्हा अशी कोणती साथ भविष्यात आलीच तर स्थानिक लोकांना उपचारासाठी नवी मुंबई किवा मुंबई गाठावी लागणार नाही. त्यांच्यावर येथेच उपचार होतील. यासाठी रवींद्र जोशी प्रयत्नशील राहणार आहेत.
 
- नितीन देशमुख
Powered By Sangraha 9.0