समाजसेवेस सदैव तत्पर

07 Dec 2020 18:36:03

anant sutar 1_1 &nbs
 
 
 
 
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे त्रस्त झालेल्या गरजूंना सॅनिटायझर, मास्कचे वाटप आणि इतर मदत करून माजी नगरसेवक आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या जैवविविधता समितीचे सभापती अनंत लक्ष्मण सुतार यांनी ऐरोली भागातील १० व १२ प्रभागातील कुटुंबांची आपल्या परिवारासारखी काळजी घेतली. कुठलीही गोष्ट त्यांना कमी पडणार नाही, यासाठी कटाक्षाने लक्ष दिले. तेव्हा, अनंत सुतार यांच्या कोरोनाकाळातील अशा या सेवाकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 

अनंत लक्ष्मण सुतार
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेवक
कार्यक्षेत्र : प्रभाग क्र. १० आणि १२, ऐरोली
संपर्क क्र. : ९८३३८ ९८८८९
 
 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यामध्ये ‘लॉकडाऊन’ लागू झाल्याने हातावर पोट असणाऱ्या मजूरवर्गाचा मोठा प्रश्न उभा राहिला. ‘लॉकडाऊन’मध्ये सर्व जग ठप्प झाल्यामुळे बऱ्याच नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, अशामध्ये ऐरोली प्रभाग क्र. १० आणि १२च्या कुटुंबांसाठी माजी नगरसेवक आणि जैवविविधता समितीचे सभापती अनंत लक्ष्मण सुतार यांनी मदतीचा हात पुढे केला. यामध्ये त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शशिकला अनंत सुतार आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना उत्तम साथ दिली. यामध्ये मास्कवाटप, मास स्क्रीनिंग टेस्ट, गरजवंतांना मोफत अन्नधान्य वाटप, तसेच संपूर्ण प्रभागाचे सॅनिटायझेशन, असे विविध उपक्रम राबवत, कोरोनाशी लढा देण्यास नागरिकांना मदत केली. जेव्हा कोरोनाचा हा कहर सुरू झाला, तेव्हा देशामध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केले. यानंतर मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईमध्येदेखील कोरोनाचे काही रुग्ण आढळून आले. प्रभाग क्रमांक १० आणि १२ मध्ये काही नागरिकांना कोरोनासदृश लक्षणे दिसून आली. याची माहिती मिळताच, अनंत सुतार यांनी एक कुटुंबप्रमुख म्हणून प्रभागाची जबाबदारी घेतली आणि सर्वप्रथम संपूर्ण प्रभागाचे सॅनिटायझेशन करून घेतले. घरोघरी, इमारतींमध्ये तसेच रस्त्यांवर जिथे जिथे गरज आहे, तिकडे मोफत सॅनिटायझेशन करण्यात आले. यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनीही प्रचंड मेहनत घेतली आणि कोरोनासारख्या विषाणूला प्रभागापासून लांब ठेवण्यास मोठी मदत झाली.
 
 
 
कोरोना महामारीचा प्रभाव नवी मुंबईमध्ये वाढू लागल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुरुवातीला लोकांमध्ये याबद्दल जागरूकता पसरविण्याचे काम अनंत सुतार यांनी केले. कोरोनाशी लढायचे असेल, तर मास्क हा प्रत्येक नागरिकाकडे असलाच पाहिजे. परंतु, सुरुवातीच्या काळात मास्कचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. अनेकांना मास्क मिळत नव्हते. यावेळी त्यांनी सामान्य नागरिक, रिक्षाचालक, दुकानदार यांना मोफत मास्कवाटपही केले. यामुळे कोरोनासारख्या भयंकर व्याधीशी लढण्यास सामान्य नागरिकांना आणखी बळ मिळाले.
 
 
 
‘लॉकडाऊन’नंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योगधंदे बंद पडले. यामुळे सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली. त्यांच्या प्रभागामध्ये रिक्षाचालक, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसायिक, घरकाम करणाऱ्या वर्गाचा समावेश होता. हातावर पोट असणाऱ्या या वर्गाच्या आवश्यक गरजांचा प्रश्न भेडसावू लागला. यामुळे ‘आता खाणार काय?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. यावेळी अनंत सुतार यांच्याकडून गरजूंना घरोघरी मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. भाजीपाला, कांदे-बटाटे याशिवाय इतर गरजू वस्तूंचे वाटप त्यांच्याकडून करण्यात आले. युवा कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात या सामाजिक कार्यात हातभार लावला. प्रभागातील तब्बल हजारो गरजू कुटुंबांना या सर्व सुविधांचा फायदा होईल, याचा विचार त्यांनी अनेक वेळा केला.
 
 

anant sutar_1   
 
 

"‘कोविड-१९’ विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले. त्यानंतर पंतप्रधानांनी देशामध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केले. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ‘लॉकडाऊन’ यामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले. ऐरोली प्रभाग क्रमांक १० आणि १२ मध्येही काही नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. या सर्व गोष्टींमुळे जनता भयभीत झाली होती. कुटुंबप्रमुख म्हणून ही बाब अस्वस्थ करणारी होती, म्हणून या काळामध्ये कुटुंबाला आधार देण्याकरिता या सर्व उपाययोजना राबविल्या." 

 
 
ऐरोलीमधील प्रभाग क्र. १० आणि प्रभाग क्र. १२ मध्ये कोरोनाचे काही रुग्ण सुरुवातीला आढळून येत असताना, त्यांना दिलासा देण्याचे कामदेखील अनंत सुतार यांनी केले. सर्व नियम पाळत घरोघरी जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचे कामदेखील त्यांनी केले. ‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी आपल्या प्रभागामध्ये ‘मास स्क्रीनिंग टेस्ट’ची व्यवस्था केली. यामध्ये सर्व नागरिकांना याचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले. एखाद्या नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना ताबडतोब उपचारासाठी पाठविण्यात आले. याचदरम्यान नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी प्रभागामध्ये ‘आर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे दोन वेळा मोफत वाटप करण्यात आले. यामुळे सुरुवातीच्या काळात प्रभागामध्ये कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. नागरिकांनाही या सर्व उपक्रमांचा आणि सहकार्याचा चांगलाच लाभ झाला.
 
 
 
राज्य सरकारने तब्बल चार महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’नंतर ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली. यादरम्यान, सामान्य नागरिकांसमोर संसाराचा गाडा पुन्हा रुळांवर आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. यावेळीदेखील अनंत सुतार हे एक कुटुंबप्रमुख म्हणून, प्रभाग क्र. १० आणि प्रभाग क्र. १२च्या अंदाजे चार ते पाच हजार लोकांच्या मदतीस पुन्हा धावून आले. एकीकडे राज्य सरकारच्या अपुऱ्या सुविधांना विरोध तर केलाच, शिवाय आपल्या प्रभागातील गरजूंना हवी ती मदत करण्यास ते पुढे सरसावले. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी गरजू आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची माहिती काढली. त्यांनी स्वतः लोकांशी संवाद साधून रेशनवाटपाचे काम केले. त्यानंतर ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांच्यासोबत लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
 
 
 
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चे नियम यामुळे प्रभाग क्र. १० आणि १२ मधील अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. यामुळे भाजीपालासारख्या रोजच्या जेवणातील पदार्थांचा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा राहिला होता. अनंत सुतार यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत, स्वस्त दरात भाजी विक्री केंद्र सुरू केले. अनेक सोसायट्यांच्या बाहेर भाजीविक्री केंद्रांची व्यवस्था करून दिली. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची साथही दिली. भाजप, नवी मुंबई आयोजित ‘संवाद आपुलकीचा’ या कार्यक्रमामध्ये प्रभागातील डॉक्टरांशी आणि कोरोनामधून मुक्त झालेल्या योद्ध्यांशी आणि इतर नागरिकांशी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी प्रभागातील बरे झालेल्या व्यक्तींनी अनंत सुतार यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले.
 
 
 
आपला प्रभाग स्वच्छ राहावा, यासाठी अनंत सुतार यांनी वेळोवेळी सर्व भागाची पाहणी केली. यावेळी जिथे मास्क, सॅनिटायझर किंवा अन्नधान्याची गरज भासली, तिथे त्या गोष्टींचे वाटप केले. प्रभागातील सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर स्टॅण्डचे वाटप केले. ‘क्वारंटाईन सेंटर’ आणि रुग्णालयात होणारी कोरोना रुग्णांची वाताहतदेखील त्यांनी राज्य प्रशासनासमोर मांडली. कोरोनाकाळामध्ये एकीकडे केंद्र सरकार उपाययोजना राबवत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सरकार मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये अपयशी ठरत होते. यावेळी राज्य सरकारला जाग यावी म्हणून त्यांनी ‘अंगण हेच रणांगण’ आंदोलन सुरू केले आणि राज्य सरकारचा निषेध केला. राज्य सरकारने काढलेल्या ‘होम क्वारंटाईन’च्या नियमांवरदेखील त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील बालवाडी मदतनिसांना त्यांचे थकीत मानधनही मिळवून दिले. माजी नगरसेवक अनंत सुतार यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या प्रभागातील नागरिकांना योग्य ती मदत करत, कोरोनासारख्या संकटाशी दोन हात करण्यास बळ दिले.


Powered By Sangraha 9.0