सफेद झगा लाल झाला!

26 Dec 2020 21:15:16

Sister Abhaya_1 &nbs
 
 
 
चर्चने प्रेमसंबंधांना पाप ठरविले आहे. चर्चच्या अधिकृत पदांवर काम करणारे दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असलेले समोर आले, तर मात्र आपल्या चर्च या व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडेल. म्हणून मग स्वत:च्या कथित पापाचे साक्षीदार झालेल्या अभयाला जिवंत जाऊ देणे, फादर थॉमस आणि सिस्टर सेफीला परवडणारे नव्हते. फादर थॉमस आणि सिस्टर सेफी दोघांनी मिळून अभयाला मारहाण केली. अभयाच्या डोक्यात जबर दुखापत झाली. चर्चच्या विहिरीत तिला बेशुद्ध अवस्थेत टाकून देण्यात आले. अभयाला मारहाण होताना झटापट झाली असेल. त्यानंतर चर्चमध्ये आवाज झाला होता. चर्चमध्ये राहणाऱ्या इतर लोकांनी हे आवाज ऐकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्यांच्यापैकी कोणीही पुढे आले नाही. कारण पाद्री म्हणजे चर्चचा प्रमुख आणि त्याच्याविरोधात जाण्याची हिंमत कोण करणार?
 
 
 
केरळच्या एका चर्चमध्ये १९९२ साली घडलेल्या खुनातील गुन्हेगारांना शिक्षा व्हायला २८ वर्षांचा काळ जावा लागला. गुन्हा करणारे ख्रिस्ती चर्चचे फादर होते किंवा त्यांची सहगुन्हेगार नन होती, हा केवळ त्यांच्या जीवनाचा एक भाग असू शकेल, असा विचार केला जाऊ शकतो. धर्माच्या पवित्र पदांवर बसूनही त्यांनी खुनासारखा गंभीर गुन्हा केला म्हणून खून करणाऱ्या इतर गुन्हेगारांपेक्षा हे दोघे जण नैतिक जगाचे जास्त गुन्हेगार आहेत, हा एक मुद्दा. परंतु, या संपूर्ण गुन्हेगारी कारस्थानात ज्याप्रकारे सर्व शक्तिनिशी गुन्हेगारांना वाचविण्याचे प्रयत्न झाले, त्यावरून या खुनाचे जाब कुणाकुणाला व का विचारले पाहिजेत, याचे उत्तर सापडेल. संबंध ख्रिस्ती संप्रदायाला किंवा चर्चला जाब विचारण्याचे काही कारण नसावे, हा तसा पटण्याजोगा विचार आहे. परंतु, जेव्हा ख्रिश्चनिटीसारख्या एका सेमेटिक पंथाची जेव्हा धर्म म्हणून स्वतंत्र व्यवस्था उभी राहते, तेव्हा अशी व्यवस्था किती शक्तिशाली आणि निरंकुश होऊ शकते, याचा अंदाज केरळच्या या ‘अभया’ प्रकरणाच्या निमित्ताने बांधला जाऊ शकतो. फादर थॉमस कोट्टूर व सिस्टर सेफी या दोघांनी २१ वर्षांच्या अभयाचा खून केला. आपल्याच चर्चच्या कॉन्व्हेंट हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या २१ वर्षांच्या लहानशा ननचा खून करण्याची वेळ चर्चच्या एका पाद्री व ननवर का आली? तर त्याचेही उत्तर या सेमेटिक पंथव्यवस्थेतच आहे. पाद्री थॉमस आणि सिस्टर सेफी यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधांविषयी व्यावहारिक, सामाजिक, नैतिक मापदंड निश्चित आहेत. परंतु, त्यातून एखाद्या तिर्‍हाईत व्यक्तीचा खून करण्याची वेळ का येते?
 
 
२७ मार्च, १९९२च्या रात्री सिस्टर सेफी आणि फादर थॉमस यांना नको त्या अवस्थेत अभयाने पाहिले. फादर थॉमस आणि सिस्टर सेफी यांनी अभयाला मारहाण केली आणि विहिरीत ढकलून दिले. प्रेमसंबंध किंवा ब्रह्मचर्याच्या वाजवी चिकित्सा होण्याला काही हरकत नाही. परंतु, चर्चने प्रेमसंबंधांना पाप ठरविले आहे. चर्चच्या अधिकृत पदांवर काम करणारे दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असलेले समोर आले, तर मात्र आपल्या चर्च या व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडेल. म्हणून मग स्वत:च्या कथित पापाचे साक्षीदार झालेल्या अभयाला जिवंत जाऊ देणे, फादर थॉमस आणि सिस्टर सेफीला परवडणारे नव्हते. फादर थॉमस आणि सिस्टर सेफी दोघांनी मिळून अभयाला मारहाण केली. अभयाच्या डोक्यात जबर दुखापत झाली. चर्चच्या विहिरीत तिला बेशुद्ध अवस्थेत टाकून देण्यात आले. अभयाला मारहाण होताना झटापट झाली असेल. त्यानंतर चर्चमध्ये आवाज झाला होता. चर्चमध्ये राहणाऱ्या इतर लोकांनी हे आवाज ऐकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्यांच्यापैकी कोणीही पुढे आले नाही. कारण पाद्री म्हणजे चर्चचा प्रमुख आणि त्याच्याविरोधात जाण्याची हिंमत कोण करणार? त्यामुळे आपल्या सहकारी मुलीचा खून झाला, हे समजूनही चर्चमध्ये राहणाऱ्यापैकी कोणीही पुढे येण्याची हिंमत दाखवू शकले नाही. चर्चमध्ये राहणाऱ्या कोणालाच अभयाची हत्या किंवा तिच्या हत्येला करणीभूत ठरलेले फादरचे गुपित माहीत नसण्याचे जवळपास अशक्य आहे.
 
कहर म्हणजे, चर्चच्या मदरनेदेखील पोलिसांकडे अनैसर्गिक मृत्यूविषयी जबाब नोंदविला. त्यांच्या जबाबात त्यांनी अभयाने आत्महत्या केली, असे म्हटले आहे. थोडक्यात, संबंधित चर्चचे संपूर्ण व्यवस्थापन फादर कोट्टूर यांना वाचविण्यासाठी कामाला लागले. अभयाचा खून करणाऱ्याना वाचविण्यासाठी चर्चच्या मदर खोटं बोलल्या होत्या का? असाही एक प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक पोलिसांनी अभयाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला, असा निष्कर्ष काढला होता. स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव होता का, हा देखील एक प्रश्न आहे. स्थानिक पोलिसांनी असा निष्कर्ष कशाच्या आधारे काढला? प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूचा प्राथमिक तपास पोलिसांनी करायचा असतो. संबंधित मृत्यू केवळ अनैसर्गिक आहे, खून नाही, याची खात्री पटल्यावरच पोलिसांनी तपास बंद करायचा असतो. अभयाच्या खटल्यात पोलिसांनी ‘फौ.प्र. कलम १७३’ खाली अहवाल दाखल केला की, अभयाचा मृत्यू आत्महत्या आहे.
 
अखेर लोकांच्या दबावापोटी आणि अभयाच्या वडिलांनी केलेल्या मागणीमुळे हा खटला १९९३ साली सीबीआयला देण्यात आला. सीबीआयने अनेक वर्षे तपास करण्यास टाळाटाळ करून १९९६ साली एक अतर्क्य अहवाल दिला. अभयाचा खून आहे की आत्महत्या, याविषयी आम्ही काही सांगू शकत नाही, असा सीबीआयचा दावा होता. सीबीआयचे तपास अधिकारी होते वरघेसे पी. थॉमस. न्यायालयाने सीबीआयचा अहवाल स्वीकारण्यास नकार दिला. अभयाच्या मृत्यूविषयी अधिक तपास करण्याच्या सूचना सीबीआयला करण्यात आल्या. १९९९ साली न्यायालयात सीबीआयच्या वतीने दुसरा अहवाल दाखल करण्यात आला. अभयाचा खून झाला, हे आता सीबीआयने मान्य केले होते. परंतु, खटला चालविण्याइतपत पुरावे नाहीत, असे सीबीआयने न्यायालयाला संगितले. २००० साली न्यायालयाने पुन्हा हा अहवाल अमान्य केला आणि सीबीआयला पुनर्तपासाचे आदेश दिले. सीबीआयने 2005 साली पुरावे नसल्यामुळे खटला बंद करण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंतीदेखील फेटाळून लावली. शेवटी सीबीआयचे डीवायएसपी नंदकुमार नायर यांनी खटल्याचा तपास केला. १७ जुलै, २००९ साली तीन जणांवर आरोप ठेवून नायर यांनी तपास पूर्ण केला. त्यात दोन फादर आणि सिस्टर सेफीचा समावेश होता. त्यापैकी एक फादर निर्दोष सुटले आहेत, तर सिस्टर सेफी आणि फादर थॉमस यांना शिक्षा झाली.
 
न्यायालयात हा खटला चालविण्यात आला, तेव्हा चर्चशी संबंधित सर्व साक्षीदारांनी सीबीआयची साथ देणे नाकारले. कायद्याच्या भाषेत सांगायचे तर साक्षीदार hostile झाले. त्यादिवशी रात्री चोरी करायला म्हणून चर्चच्या कंपाऊंडवर चढलेला चोर आपल्या विधानावर कायम राहिला. त्याने रात्री फादर थॉमस आणि नन सेफीला एकत्र काहीतरी शोधत असताना पाहिले होते. दरम्यान, या चोराला स्वतःहून खुनाची जबाबदारी घेण्यासाठी आमिष देण्यात आले. स्थानिक पोलिसांनी भरपूर मारझोड केली. परंतु, हा चोर आपल्या विधानावर शेवटपर्यंत ठाम राहिला. त्यामुळे लौकिक जगाच्या दृष्टीने चोर असलेला हा ‘राजू’ सर्वाधिक प्रामाणिक होता, असे म्हटले पाहिजे.
 
 
एका खुनातील आरोपींना शिक्षा व्हायला २८ वर्षांचा काळ लागला? दरम्यान, अभयाने आत्महत्या केली म्हणून स्थानिक पोलिसांनी अहवाल कसा सादर केला? वारंवार सीबीआय तपास बंद करण्याची विनंती का करीत होते? जर न्यायालय नसते तर? राजू नावाच्या चोराने खुनाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतल्यामुळे कोणाचा फायदा होणार होता? हे सर्व घडवून आणणारी यंत्रणा कोणती होती? चर्चच्या मदरने अभयाने आत्महत्या केली, असा जबाब का दिला? हे व असे अनेक प्रश्न या २८ वर्षांपूर्वीच्या खूनप्रकरणाने उपस्थित केले पाहिजेत. परंतु, माध्यमात किंवा अन्यत्र कुठेच हे प्रश्नसुद्धा का उपस्थित केले जात नाहीत, हादेखील एक प्रश्न आहे. आपण उत्तरे समजून घेण्याइतपत सुज्ञ असावे, या अपेक्षेसह थांबतो.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0