शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

19 Dec 2020 11:39:47

Mohan Rawale_1  
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आणि अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले याचे निधन झाले आहे. वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला आहे. आपल्या वैयक्तिक कामासाठी मोहन रावले गोव्यामध्ये गेले होते. तिथे त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
 
 
 
 
 
मोहन रावले हे पाच वेळा खासदार राहिले होते. मुंबईतील परळ - लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. सर्वसामान्याचे नेते आणि परळ ब्रँड अशी त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ लालबागमध्ये जे कडवट शिवसैनिक निर्माण केले, त्यातील मोहन रावले हे पहिल्या फळीचे शिवसैनिक होते, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील, असे वाटले नव्हते. परळ ब्रँड शिवसैनिक हिच त्यांची ओळख होती, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0