टॉप ग्रुप 'ईडी' चौकशी : सरनाईकांचा निकटवर्तीय अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2020
Total Views |

ED_1  H x W: 0
 
 
ठाणे : 'टॉप सिक्युरीटी'मधील महत्वाच्या पदावरील व्यक्ती तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कंपन्यावर महत्वाच्या पदावर असलेली व्यक्ती अमित चंडोळे यांना इडीने अटक केली. अमित चंडोळे यांना २४ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. बुधवारीही त्यांची चौकशी झाली. या चौकशीत चंडोळे यांना अंमलबजावणी संचलनालयाने अटक केली. विहंग सरनाईक यांनाही पुन्हा आज चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पहिल्या अटकेमुळे आता आणखी काही धागेदोरे सापडणार का याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
 
 
दरम्यान, सरनाईक परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांनी विलगीकरण कक्षात आपला मुक्काम हलवला आहे. त्यामुळे ईडीने त्यांना आठवडाभरानंतर कार्यालयात चौकशीसाठी बोलवावे, अशी विनंती केली आहे. दरम्यान चंडोळे हे सरनाईक यांचे बालपणापासूनचे मित्र आहेत. सरनाईक यांचे जुने निवासस्थान असलेल्या आणि समता नगरच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीत चंडोळे राहतात. त्यांच्या अटकेमुळे सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ईडीचे एक पथक नाशिकमध्ये पोहोचल्याचीही माहिती आहे.



@@AUTHORINFO_V1@@