
चित्रपट दिग्दर्शक एरे कॅथर यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : चित्रपट दिग्दर्शक एरे कॅथर (Eray Cather) यांनी एका बड्या युट्यूबरवर नामांकित व्यक्तींविरोधात विश्लेषणात्मक व्हीडिओ तयार करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्री कंगना रणौत, रिपब्लिक टिव्हीचे एडीटर इन चीफ अर्णब गोस्वामी, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे कुटूंबीय आदींचा यात सामावेश आहे. एरे यांनी यात कुणाचे नाव घेतले नव्हते. मात्र, आम आदमी पक्षाचे समर्थक ध्रुव राठी यांनी नाव न घेता मला लक्ष्य केले जात आहे, असे म्हटले. राठी यांनी हे आरोप धुडकावून लावले आहे. त्यानंतर कंगनाने हा थेट आरोप केला की, माझ्याविरोधात व्हीडिओ तयार करण्यासाठी ६० लाख रुपये देण्यात आले आहेत.
कॅथर यांनी ट्विटमध्ये आरोप केला होता की, युट्यूबरचे ४० लाखांहून अधिक सबस्क्राईबर असणाऱ्या या युट्यूबरने सुशांतच्या कुटूंबीयांविरोधात एक व्हीडिओ तयार करण्यासाठी ६५ लाख रुपये इतकी रक्कम घेतली. व्हीडिओ तयार करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. याच युट्यूबरला कंगना आणि अर्णब विरोधात निशाणा साधण्यसाठी ‘कंत्राट’ देण्यात आले होते.
कॅथर यांनी आपल्या ट्विटमध्ये युट्यूबरचे नाव घेतले नाही. आम आदमी पक्षाचे समर्थक ध्रुव राठी यांनी हा आळ स्वतःवर ओढावून घेतला आहे. “ही खोटी अफवा माझ्याविरोधात पसरवली जात आहे का?”, असा प्रश्न त्यांनी विचारला. योगायोग म्हणजे युट्यूबर राठी यांचेही ४.५ दशलक्ष सबस्क्राईबर आहेत. राठी यांनी काहीही न पाहता स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली.
आप समर्थक ब्लॉगर म्हणाले, “सर्वात आधी कंगनाचा कुठलाही व्हीडिओ बनवण्यासाठी कोणी मला पैसे दिलेले नाहीत. सुशांत सिंह राजपूतवर व्हीडिओ बनवण्याची काहीही माझी योजना नाही. तिसरे म्हणजे माझी स्पॉन्सरींग प्रति व्हीडिओ ३० लाख असावी, असे मला वाटते. मी किती श्रीमंत असेन.”
ध्रुव राठी यांनी या वादावर नाव न घेतल्यानंतरही स्पष्टीकरण देण्यास सुरुवात का केली, त्यानंतर एरे कॅथेर यांनी खोचक ट्विट करत तुम्ही सुशांत विरोधात आता व्हीडिओ तयार करणार नाही, हे ऐकून आता बरे वाटले. सर्वात आधी मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. ध्रुव राठी यांना त्यांच्याबद्दल हे म्हणणे वाटत असेल तर त्यांचे स्वागत. दुसरे म्हणजे इतके भरमसाठ शुल्क आकारण्याबद्दल मी विचार करेन परंतू माझा सध्या तो फोकस नाही. तिसरे म्हणजे तुम्ही सुशांत सिंहच्या कुटूंबियांविरोधात व्हीडिओ बनवण्याचा विचार सोडून दिला हे ऐकून आनंद झाला. तसेच याचे उत्तर दिले त्याबद्दलही धन्यवाद.”
कंगना रणौत आणि मुंबई महापालिका हा वाद झाल्यानंतर विरोधात खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल कंगनाने राठी यांना फटकारले होते. कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर कंगनाने पुन्हा एकदा टीका केली आहे. फेक व्हीडिओ बनवण्यासाठी यांना पैसे मिळतात. पालिकेच्या नोटीशीबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल मी त्याला तुरुंगात पाठवू शकते, असे ट्विट कंगनाने केले आहे.