धुळ्यामध्ये 'कमळ' फुलले ; ३१ जागा जिंकून भाजपची सत्ता

08 Jan 2020 16:29:19


saf_1  H x W: 0

 


धुळे : धुळे जिल्हा नगर परिषदेमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार करून ३१ जागा मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातही भाजप आघाडीवर आहे. आतापर्यंत ५६ पैकी ४३ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये ३१ जागांवर भाजपने विजय मिळावला आहे.

 

शिरपूर तालुक्यात १०, शिंदखेळा तालुक्यात ८, साक्री तालुक्यात ३ आणि धुळे तालुक्यात १० जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसने २ तर शिवसेनेने ३ जागा मिळवल्या. सुरेश भामरे आणि जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हा विजय साजरा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यामधील प्रचारात विशेष लक्ष घातले होते. त्याचाच परिणाम म्हणजे धुळ्यात भाजपने मोठी उडी मारली. आमदार जयकुमार रावल यांच्या मतदार संघात १० पैकी ८ ठिकाणी भाजपने मिळवला.

Powered By Sangraha 9.0