जिओची भन्नाट वाय-फाय कॉलिंग सेवा सुरु!

07 Jan 2020 16:51:44

jio_1  H x W: 0


रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईमध्ये वॉइस ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा फक्त सॅमसंग आणि अॅपल युजर्ससाठी उपलब्ध असून, लवकरच शाओमी आणि वनप्लसच्या युजर्ससाठी देखील ही सेवा सुरू केली जाणार आहे.


वॉइस ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवेचा वापर घरातील वाय-फाय कनेक्शन आणि सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटद्वारे करता येईल. यामुळे कंपनीला मोठा फायदा होणार आहे.
ग्राहकाला कंपनीच्या या सेवेसाठी वेगळे अॅप, लॉग इन अथवा नवीन नंबर घ्यावा लागणार नाही. कंपनी ही सेवा लवकरच इतर राज्यांमध्ये देखील सुरू करणार आहे.



नेमके
काय आहे वाय-फाय कॉलिंग ?

वाय-फाय कॉलिंगला वॉईस ओव्हर वाय-फाय अथवा VoWiFi देखील म्हटले जाते. या फीचरमध्ये कुठल्याही वाय-फायद्वारे म्हणजेच होम वाय-फाय, पब्लिक वाय-फाय आणि वाय-फाय हॉट स्पॉटच्या मदतीने कॉलिंग करू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या फोनमध्ये नेटवर्क नसेल तर तुम्ही कोणत्याही फ्री वाय-फाय अथवा कोणाकडून हॉटस्पॉट घेऊन फोनवर आरामशीर गप्पा मारू शकता. तुम्ही कोणत्याही वाय-फायद्वारे फ्रीमध्ये कॉल करू शकता आणि यावर कुठलेही वेगळे रोमिंगचे पैसे द्यावे लागणार नाहीत.

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय कॉलिंग सपोर्ट फीचर असेल, तरच तुम्ही याचा वापर करू शकता. फोनच्या नेटवर्क सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही हे फिचर तपासू शकता.

Powered By Sangraha 9.0