महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का ?

    04-Jan-2020
Total Views |

UT   dd _1  H x


जालना : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नाराजीनंतर आता महाविकास आघाडीला आणखी एका आमदाराने धक्का दिला आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने अखेर कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. 'हम बावफा थे जो उनकी नझरोंसे गीर गए शायद उन्हे किसी बेवफा की तलाश थी', अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी मांडली.

 

महेश भवन येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली होती. गोरंट्याल यांनी यापूर्वी एक पत्रकार परिषदही घेतली. मंत्रीमंडळात स्थान देणार असल्याचे आश्वासन वरिष्ठांकडून मिळाले होते. मात्र, त्यानंतर ऐनवेळेस आपल्याला का डावलले याबद्दल समजू शकलेले नाही, असे गोरंट्याला म्हणाले आहेत.