'आज अशा बऱ्याच बातम्या येतील': चंद्रकांतदादा पाटील

    04-Jan-2020
Total Views |


chandrakant patil_1 



मुंबई
: राज्यमंत्री मंडळाचा विस्तार झाला असला तरी यानंतर महविकास आघाडीच्या नेत्यांमधील खातेवाटपासाठीची नाराजी समोर आली. परंतु या विस्तारानंतर मंत्री पदाची शपथ घेऊनही पाहिजे ते की खाते न मिळाल्याच्या कारणावरून शिवसेनेचे अब्दुल सत्तर यांनी राजीनामा दिला. शिवसेनेने जरी याबाबत बोलणे टाळले असेल तरीही या राजीनाम्यामुळे भाजपसाठी मात्र हा सुखद धक्का आहे..सत्तारांच्या राजीनाम्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले
, 'ही पहिली बातमी आहे. अशा आता अनेक बातम्या आता येतील.'







भाजप नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही महविकास आघाडीत नाराजी असल्याचे उघड झाले असल्याचे सांगितले. तर भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी शिवसेनेला टोला लागवत अब्दुल सत्तारांचा राजीनामा म्हणजे
, लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला अशी टीका केली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. 'कुणी राजीनामा दिला म्हणून भाजपला आनंद होण्याचं काही कारण नाही. खरंतर, ही आघाडी चुकीच्या आधारावर निर्माण झाली आहे. त्यामुळं हे सगळं होतच राहणार. आम्ही आधीच हे सांगितलं होतं,' असं मुनगंटीवार म्हणाले.