मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता अश्वदळ!

20 Jan 2020 15:07:38

mp_1  H x W: 0


तब्बल ८८ वर्षांनी सक्रीय होणार पोलिसांचे आधुनिक अश्वदळ

मुंबई : तब्बल ८८ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईतील खूप जुने असे पोलिसांचे अश्वदळ सुरु होणार आहे. पुन्हा एकदा नव्याने सुरु होणाऱ्या या अश्वदळाला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळणार आहे. मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या अनेक दळांमध्ये या नव्या दळाची पडणार असल्याने पोलिसांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. हे युनिट २६ जानेवारीला म्हणजेच प्रजाकसत्ताक दिनापासून सुरु होणार आहे. ३० घोडे मुंबई पोलिसांच्या या युनिटमध्ये असणार आहेत.


बृहन्मुंबईच्या या माउंटेड पोलीस युनिटमध्ये सब इन्सपेक्टर, एएसआय, हेडकॉन्स्टेबल, ३२ कॉन्स्टेबल असणार आहेत. त्याशिवाय याचा वापर जमावावर नियंत्रण करण्यासाठीदेखील केला जाणार आहे. अश्वदळात असणाऱ्या पोलिसांना वॉकीटॉकी देण्यात येणार आहे. यापैकी समुद्र किनारी दोन घोडे असतील. या घोडेस्वारांना बॉडी कॅमेरा दिला जाणार आहे. शिवाय मरोळमध्ये पागा तयार केल्या जाणार आहेत. सध्या दादरच्या शिवाजी पार्क येथे याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.


२६
जानेवारीच्या शिवाजी पार्क येथील परेडमध्ये या दळातील ११ घोडे असतील. आर. टी. निर्मल हे या दळाच्या प्रशिक्षणाचे प्रमुख आहेत. यासाठी सरकारने आतापर्यंत १३ घोडे खरेदी केले आहेत, तर १७ घोड्यांची खरेदी येत्या काळात केली जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0