'द बिग बुल हर्षद मेहता घोटाळा' आता मोठ्या पडद्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |
The Big Bull _1 &nbs
 

अभिषेक बच्चनने शेअर केले पोस्टर


मुंबई : देशातील शेअर बाजारात १९९० ते २००० दरम्यान हाहाकार माजवणाऱ्या हर्षद मेहता घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित 'द बिग बुल'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेते अभिषेक बच्चन आणि अजय देवगण यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले.

 

२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. यात इलियाना डिक्रूजही महत्वाच्या भूमीकेत दिसणार आहे. अजय देवगण आणि अभिषेक बच्चन ही जोडी तब्बल सात वर्षांनी एकत्र दिसणार आहे. यापूर्वी ते २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बोलबच्चन' या चित्रपटात एकत्र दिसले होते. अभिषेक बच्चन या चित्रपटात कुख्यात शेअर ब्रोकर हर्षद मेहताची भूमीका साकारणार आहे.

 

'बिग बुल' हर्षद मेहता

हर्षद मेहताला बिग बुल संबोधले जात असे, त्याकाळी त्याने शेअर बाजारात बुल सुरू केला होता. मात्र, त्यानंतर त्याने केलेले घोटाळे उघड झाले. हर्षद मेहताच्या घोटाळ्यामुळे संपूर्ण देशभरातील शेअर बाजार हलला होता. त्यानंतर मेहताला अटक करण्यात आली होती. वयाच्या ४७ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

 

अभिषेकच्या लूकची चर्चा

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चन अंधारात दिसत आहे. २०२० हे वर्ष बिग बूल असणार असे, या पोस्टरवर लिहीले आहे. द बिग बूल, ज्याने आपली स्वप्ने भारताला विकली, असे पोस्टरवर लिहीण्यात आले आहे. यापूर्वी अभिषेक बच्चनने गुरू चित्रपटात धीरुभाई अंबानी यांचे पात्र साकारले आहे.



 
@@AUTHORINFO_V1@@